सध्या सर्वत्र सचिन तेंडुलकर या नावाचा जयघोष होताना दिसतोय. निमित्तही तसेच आहे. क्रिकेटमधील सर्व विक्रम आपल्या नावावर केलेला सर्वाचा लाडका सचिन निवृत्ती घेतो आहे. त्याचा शेवटचा सामना गुरुवारपासून सुरू झाला. तोच सोशल मीडियावर त्याच्या कौतुकाचे वादळ उठू लागले. सगळ्या सेलिब्रेटींपाठोपाठ सचिनने ट्विटरवर आपले अकाऊंट सुरू केले आणि चाहत्यांनी त्यावर उडय़ा मारल्या. निवृत्तीच्या काही दिवस आधीच त्याने फेसबुकवरही आपले अधिकृत पेज सुरू केले. या पेजवर सध्या एक कोटी एकोणीस लाख ७५ हजार १९७ लाईक असून सातत्याने तब्बल चार लाख ८४ हजार ७४१ लोक सातत्याने चर्चा करत असतात. अशीच काही सचिनबद्दलची फेसबुक पेजेस आहेत त्याविषयी जाणून घेऊया..
अधिकृत सचिन
https://www.facebook.com/SachinTendulkar हे सचिनचे अधिकृत फेसबुक पेज आहे. यावर सचिनचे शेकडो फोटोज असून त्याचे काही खास व्हिडीओ अपलोड करण्यात आले आहेत. याशिवाय काहीच वेळेस सचिन आपल्या चाहत्यांसाठी गप्पा मारण्यासाठीही भेटतो. या पेजवर सचिनच्या जाहिरातींपासून ते सचिनबद्दल सर्व काही देण्यात आले आहे. सचिनचे सामन्यातील काही फोटोही आपल्याला या पेजवर पाहावयास मिळतात.
ट्विटरही सचिनमय
मायक्रो-ब्लॉिगग वेबसाइट ट्विटरही सध्या सचिनमय झाले आहे. यावर सचिनचे
/twitter.com/sachin_rt>
हे अधिकृत ट्विटर खाते असून त्यामध्ये त्यांना ३८ लाख २० हजार ७७७ फोलोवर्स आहेत. याशिवाय रोज सचिनबद्दल माहिती शेअर करणारे टग्स ट्विटरवर देण्यात आले आहेत.
ओपन ग्रुप
https://www.facebook.com/groups/2212655945/  सचिन तेंडुलकर नावाचा एक ग्रुप तयार करण्यात आला असून यामध्ये सध्या २२ हजार ४२३ सभासद असून ते सातत्याने यावर सचिनचे अपडेट देत असतात. यामध्ये सचिनबद्दल खुली चर्चाही होताना दिसते. सचिनचा हा ग्रुप कुणीही जॉइन करू शकतो. यामध्ये सचिनच्या फोटोंचे तब्बल २४ अल्बम्स तयार करण्यात आले आहेत.
सचिनचे फोटो
https://www.facebook.com/search/344128252278047/photos- सचिन तेंडुलकरचे लहानपणापासून ते सामन्यातील काही महत्त्वपूर्ण फोटोज जर आपल्याला पाहायचे असतील तर फोटो ऑफ सचिन तेंडुलकर या फेसबुक पेजवर क्लिक करा. तुम्हाला शेकडो अमोलिक फोटो पाहावयास मिळतील. या फोटोंमध्ये पाकिस्तानबरोबरच्या सामन्यातील काही अविस्मरणीय क्षण असून त्याला सर्वाधिक लाइक्स मिळाले आहेत; तर साऊथ आफ्रिकेच्या सामन्यातील सचिनचे कौतुक करणाऱ्या दक्षिण आफ्रिकी खेळाडूंसोबतच्या फोटोलाही २५६४ लाइक्स मिळाले आहेत; तर सचिन आणि ब्रायन लारा यांची तुलना करणाऱ्या फोटोला तब्बल २०४ कमेंट्स आहेत.