02 June 2020

News Flash

सोलापुरातील २७ सहकारी संस्थांचा उद्या सन्मान सोहळा

आंतरराष्ट्रीय सहकार वर्षांची सांगता होत असल्याचे औचित्य साधून सोलापूरचा सहकार विभाग व सिंहगड बिझनेस स्कूलच्या वतीने सोलापूर जिल्ह्य़ातील उल्लेखनीय अशा २७ सहकारी संस्थांचा पुरस्कार देऊन

| December 26, 2012 08:00 am

आंतरराष्ट्रीय सहकार वर्षांची सांगता होत असल्याचे औचित्य साधून सोलापूरचा सहकार विभाग व सिंहगड बिझनेस स्कूलच्या वतीने सोलापूर जिल्ह्य़ातील उल्लेखनीय अशा २७ सहकारी संस्थांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. येत्या २८ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता पुणे रस्त्यावरील केगाव येथे सिंहगड बिझनेस स्कूलमध्ये हा सन्मान सोहळा आयोजिला आहे.
जिल्ह्य़ात सुमारे १० हजार ५०० सहकारी संस्था आहेत. यात सर्वाधिक ८७२ पतसंस्था आहेत. तालुकास्तरावर उल्लेखनीय कार्यरत असलेल्या संस्थांची माहिती मागविण्यात आली होती. त्यातून २७ संस्थांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक श्रीकांत मोरे व सिंहगड स्कूलचे संचालक प्रा. डॉ. राजशेखर येळीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पुरस्कारासाठी निवड झालेल्या सहकारी संस्थांची नावे अशी-  सहकारभूषण पुरस्कार- सुमित्रा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, अकलूज (१०० कोटींच्या ठेवी), लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था, सोलापूर (१०० कोटी ठेवी) व मार्केंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय, सोलापूर (सर्वसाधारण संस्था).
सहकारनिष्ठ पुरस्कार- धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, मंगळवेढा (महिला पतसंस्था), जिजामाता महिला ग्रामीण बिगरशेती पतसंस्था, मंगळवेढा (महिला संस्था), मोहोळ नागरी सहकारी पतसंस्था, मोहोळ (५० कोटी ठेवी), मंगळवेढा तालुका खरेदी-विक्री संघ, मंगळवेढा (पणन संस्था), कर्मयोगी सुधाकर परिचारक ग्रामीण बिगरशेती पतसंस्था, तुंगत, ता. पंढरपूर(५० कोटींपर्यंत ठेवी), सहस्त्रार्जुन नागरी पतपेढी, सोलापूर, रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील महिला हातकागद संस्था, कोंढारपट्टा, (औद्योगिक संस्था), निर्मल ग्रामीण बिगरशेती पतसंस्था, खंडाळी, दक्षिण सोलापूर तालुका गटसचिवांची पतसंस्था, सोलापूर  (सेवक पतसंस्था), मंगळवेढा लोकमंगल बिगरशेती पतसंस्था, मंगळवेढा, बळीराजा ग्रामीण बिगरशेती पतसंस्था, मंगळवेढा व महात्मा फुले नागरी पतसंस्था, सांगोला.
आदर्श संस्था पुरस्कार-आनंद ग्रामीण बिगरशेती सहकारी संस्था, जेऊर, ता. करमाळा, माढेश्वरी नागरी सहकारी संस्था, माढा (जिल्हास्तर बँक), धुळदेव ग्रामीण बिगरशेती पतसंस्था, नातेपुते, ता. माळशिरस, शिवशंकर मध्यवर्ती सहकारी ग्राहक संस्था, अकलूज (ग्राहक संस्था), समर्थ महिला विकास नागरी पतसंस्था, अक्कलकोट), यशवंतभाऊ पाटील ग्रामीण बिगरशेती पतसंस्था, भोसे, ता.पंढरपूर, निशिगंध नागरी बँक, पंढरपूर, आर्यनंदी नागरी पतसंस्था, सोलापूर, सोलापूर महापालिका प्राथमिक शिक्षक पतसंस्था, सोलापूर, सांगोला नागरी बँक, सांगोला, शिवशक्ती नागरी बँक, बार्शी, भगवंत सहकारी पुरवठा मंडळ, बार्शी, मोहोळ नागरी बँक, मोहोळ, दिलीप माने उत्तर सोलापूर तालुका गटसचिवांची पतसंस्था, उत्तर सोलापूर, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडार, सोलापूर, बसवेश्वर ग्रामीण बिगरशेती पतसंस्था, हत्तूर, ता. दक्षिण सोलापूर, गुरुमाऊली नागरी पतसंस्था, सांगोला, लक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती पतसंस्था, सिध्दापूर, ता. मंगळवेढा, वैनगंगा कृष्णा बँक कर्मचारी पतसंस्था, सोलापूर, पंडितराव नागरगोजे नागरी पतसंस्था, बार्शी, श्री दत्त नागरी पतसंस्था, बार्शी, श्रीकृष्ण इन्फर्मेशन टेक्नो. सिस्टिम अ‍ॅन्ड सव्‍‌र्हिसेस को. ऑप. सोसायटी, मंगळवेढा, सुवर्णक्रांती महिला उद्योग स्वयंरोजगार संस्था, मंगळवेढा, आदर्श नागरी पतसंस्था, सोलापूर, सोलापूर गवळी समाज पतसंस्था, सोलापूर, अहिल्यादेवी नागरी पतसंस्था, सोलापूर व रुक्मिणीदेवी ग्रामीण बिगरशेती पतसंस्था, मार्डी, ता.उत्तर सोलापूर.
येत्या २८ डिसेंबर रोजी सोलापूरचे पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. सहकार आयुक्त मधुकर चौधरी हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. यावेळी सिंहगड संस्थेचे प्रमुख प्रा. एम. एन. नवले व जिल्हाधिकारी गोकुळ मवारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याचवेळी आयोजिलेल्या चर्चासत्रात प्रा. नवले व ज्येष्ठ लेखा सनदीपाल सी. आर. दोशी यांची भाषणे होणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2012 8:00 am

Web Title: solapurs 27 co operative societies honoured on tomorrow
टॅग Honour
Next Stories
1 खेळाडू, क्रीडा संघटकांना रमा-जगदीश क्रीडा पुरस्कार
2 दर्पण पुरस्कारांचे ६ जानेवारीला पोंभुर्ले येथे समारंभपूर्वक वितरण
3 कोल्हापूरच्या पॅरालिम्पिक खेळाडूंना ‘साफल्य’ पुरस्कार
Just Now!
X