News Flash

जावयाकडून सास-याचा खून

श्रीगोंदे तालुक्यातील हिरडगाव येथील वृद्धाचा जावयानेच निर्घृण खून केला. स्वत:ची आई व बायकोलाही या आरोपीने मारहाण केली.

| September 28, 2013 01:55 am

श्रीगोंदे तालुक्यातील हिरडगाव येथील वृद्धाचा जावयानेच निर्घृण खून केला. स्वत:ची आई व बायकोलाही या आरोपीने मारहाण केली.
किसन तात्याबा गुनवरे (वय ६५) यांचा त्यांचा जावई सुनील रखमाजी दरेकर (रा. हिरडगाव) याने कुदळीने वार करून खून केला. स्वत:ची आई विमल रखमाजी दरेकर व बायको अर्चना यांनाही त्याने मारहाण करून जखमी केले.  
याबाबत घडलेली घटना अशी, की श्रीगोंदे तालुक्यातील हिरडगाव येथील सुनील दरेकर हा घरात सतत भांडणे करीत होता. त्याने हे कुटुंब वैतागले होते. त्याचे सासरे किसन गुनवरे हे त्याला समजावून सांगण्यासाठी बुधवारी हिरडगाव येथे आले होते. ते त्याला भांडणे करू नको असे समजावून सांगत असतानाच सुनील याला राग आला व त्याने सासरा, स्वत:ची आई व बायको या तिघांना कुदळीने मारहाण केली. या मारहाणीत गुनवरे यांना गंभीर इजा झाली. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, उपचार सुरू असताना आज त्यांचे निधन झाले. पोलिसांनी सुनील याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2013 1:55 am

Web Title: son in law murdered father in law
Next Stories
1 धनादेश वटला नाही जामीनदारास १ कोटीचा दंड
2 माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांना जीवनगौरव पुरस्कार
3 सोलापुरात आयुक्त गुडेवारांची डिजिटल फलकांविरुद्ध कारवाई
Just Now!
X