News Flash

घराच्या वादातून मुलाकडून पित्याचा खून

घर विकण्यावरून झालेल्या वादात मुलाने पित्याचा निर्घृण खून केल्याची घटना पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाळाभाऊपेठ येथे घडली.

| May 22, 2014 01:06 am

घर विकण्यावरून झालेल्या वादात मुलाने पित्याचा निर्घृण खून केल्याची घटना पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाळाभाऊपेठ येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलास अटक केली आहे.
ज्ञानेश्वर दशरथ पौनीकर (४८) असे मृताचे नाव असून रूपचंद पौनीकर (२६) असे आरोपी मुलाचे नाव आहे. दोघेही बापलेक टेलरिंगचे काम करतात. ज्ञानेश्वरचे पत्नीसोबत नेहमीच क्षुल्लक कारणावरून भांडण होत असे.
मंगळवारी मध्यरात्री कोणत्या तरी कारणावरून तो पत्नी रुक्मिणीला शिव्या देऊ लागला.
यावेळी घराच्या दुसऱ्या खोलीत असलेल्या रूपचंदने वडिलांना समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु भांडण न मिटता ते एवढे विकोपाला गेले की, रागाच्या भरात ज्ञानेश्वरने जवळच्या कैचीने रूपचंदच्या शरीरावर वार केले. त्यामुळे रूपचंदचा क्रोध अनावर होऊन त्याने तीच कैची हिसकावली वडिलाच्या छातीवर वार केले. त्यात ज्ञानेश्वर गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच मरण पावला.
घटनेची माहिती मिळताच पाचपावली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक डोर्लीकर सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी मेओ रुग्णालयात पाठवला.
पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून आरोपी रूपचंदला अटक केली. ज्ञानेश्वरने काही दिवसांपूर्वी एक भूखंड खरेदी केला होता.
आपल्या म्हणण्याप्रमाणे पत्नी व दोन मुले ऐकत नसल्याचा त्याचा समज होता. त्यामुळे तो नेहमीच भूखंड विकून टाकेल व त्याची रक्कम कुणालाही देणार नाही, अशी धमकी घरच्यांना देत होता त्याच्या या वागण्याने कुटुंबातील सर्व सदस्य त्रस्त होते, असे पोलीस सूत्रांकडून समजते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2014 1:06 am

Web Title: son kills father as mother watched in shock
Next Stories
1 संजय खोब्रागडेला पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने जाळल्याचे उघड
2 नागपूर विभागातील मोठय़ा प्रकल्पात मुबलक जलसाठा
3 तरुणीला जखमी करून लुटारूंनी दागिने पळविले