जिल्ह्य़ात आतापर्यंत सरासरी ९२.४७ मि.मी. पाऊस झाला. शनिवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत सरासरी १८.७१ मिमी पावसाची नोंद झाली.
जिल्ह्य़ात शुक्रवारी तालुकानिहाय झालेला पाऊस, कंसातील आकडे आतापर्यंतच्या मिमी पावसाचे – जालना १७.६३ (१०९.९), भोकरदन ३१.७५ (१२०.९), जाफराबाद ३७ (१६७.२), बदनापूर १४.४० (८९.४), परतूर १४ (५९.४), अंबड १४.१४ (९१.७२), घनसावंगी १४.५० (४८.२५). अधिक पाऊस झालेल्या जाफराबाद व भोकरदन तालुक्यांत जवळपास ९० टक्के पेरणी झाल्याचा अंदाज आहे. या तालुक्यांत प्रामुख्याने कापूस, सोयाबीन व मका पिकांखालील क्षेत्र आहे. अंबड, घनसावंगी व जालना तालुक्यांत ७० टक्के पेरणी झाली. परतूर व मंठा तालुक्यांत खरीप पिकांच्या निम्म्या क्षेत्रावर पेरणी झाली.