23 November 2017

News Flash

चिमणी झाली दिल्लीची ‘राज्यपक्षी’

दुर्मिळ होत असलेल्या चिमणीला राज्यपक्षाचा दर्जा देण्यासाठी ‘स्पॅरोज शेल्टर’ या संस्थेने प्रयत्न सुरू केले

प्रतिनिधी | Updated: November 26, 2012 11:17 AM

दुर्मिळ होत असलेल्या चिमणीला राज्यपक्षाचा दर्जा देण्यासाठी ‘स्पॅरोज शेल्टर’ या संस्थेने प्रयत्न सुरू केले होते. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून संस्थेच्या प्रतिनिधींनी दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्याकडे निवेदन देऊन त्यासंबंधीचा पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून शीला दीक्षित यांनी चिमणीला दिल्लीचा राज्यपक्षी म्हणून घोषित केले आहे. ‘स्पॅरोज शेल्टर’चे अध्यक्ष प्रमोद माने यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत चिमणीचे पर्यावरणीय महत्त्व त्यांना पटवून देण्यात आल्याचे सांगितले.

First Published on November 26, 2012 11:17 am

Web Title: sparrow is now delhi statebird