जिल्हय़ात गेल्या सात वर्षांत बेपत्ता झालेल्या १९६ व्यक्तींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे यांनी दिली. बेपत्ता व्यक्तींमध्ये ८६ पुरुष, ७२ महिला, २८ मुले व ११ मुलींचा समावेश आहे.
बेपत्ता व्यक्तींचा नातेवाइकांना अजून शोध लागला नाही. ही आकडेवारी संपूर्ण जिल्हय़ाची आहे. जिल्हय़ात अनेक पोलीस ठाण्यांमधील प्रकरणे निकाली काढण्याचा हा भाग असल्याचे दाभाडे यांनी सांगितले. तपासात बेपत्ता व्यक्तीचा तपास करणे किंवा त्यावरील कारवाईची योग्य ती दफ्तरी नोंद करून प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी ही विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याचे दाभाडे यांनी स्पष्ट केले.