News Flash

हैदराबाद-पाटणादरम्यान विशेष रेल्वेगाडी

सणासुदीच्या दिवसांतील प्रवाशांची वाढलेली गर्दी आणि प्रतीक्षा यादी पाहता या आठवडय़ात हैदराबाद व पाटणादरम्यान नागपूरमार्गे एक

| November 6, 2013 08:16 am

सणासुदीच्या दिवसांतील प्रवाशांची वाढलेली गर्दी आणि प्रतीक्षा यादी पाहता या आठवडय़ात हैदराबाद व पाटणादरम्यान नागपूरमार्गे एक विशेष रेल्वेगाडी धावणार आहे. ०७०९१ हैदराबाद- पाटणा ही विशेष गाडी मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता हैद्राबादहून निघाली असून उद्या, बुधवारी रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी पाटणा येथे पोहचेल. ही गाडी उद्या (दि. ५) रात्री ९ वाजून ४५ मिनिटांनी नागपूरला येईल व ९.५५ वाजता रवाना होईल.
०७०९२ पाटणा- हैदराबाद ही विशेष गाडी ८ नोव्हेंबरला, शुक्रवारी दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी पाटणा येथून सुटेल आणि शनिवार-रविवारच्या मध्यरात्री साडेबारा वाजता हैद्राबादला पोहचेल. ही गाडी ९ नोव्हेंबरला, शनिवारी दुपारी २ वाजता नागपूरला येईल आणि दहा मिनिटांनी रवाना होईल.
ही गाडी सिकंदराबाद, काझीपेठ, जमिकुंटा, पेद्दापल्ली, रामगुंडम, मंचेरियाल, सिरपूर कागजनगर, बल्लारशहा, नागपूर, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, शंकरगड, चेऊकी, मिर्झापूर, मुगलसराय, बक्सर, आरा व दानापूर या स्थानकांवर थांबेल. या गाडीला एसी टू टियर व एसी थ्री टियरचा प्रत्येकी १, शयनयान श्रेणीचे ५, सामान्य द्वितीय श्रेणीचे ९ आणि दोन एसएलआर असे एकूण १८ डबे राहतील. प्रवाशांनी या विशेष गाडीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2013 8:16 am

Web Title: special train between hyderabad patna
टॅग : Special Train
Next Stories
1 तुटपुंज्या अनुदानामुळे अतिवृष्टीग्रस्तांमध्ये निराशा
2 काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा जागावाटपाचा फॉर्म्यूला लोकसभेसाठी काँग्रेस २९, राष्ट्रवादीला १९ जागा
3 हिंमत असल्यास काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी जागा वाटप जाहीर करावे -आमदार बाजोरिया
Just Now!
X