News Flash

अ‍ॅड. श्रीहरी अणे यांचे आज व्याख्यान

जय महाकाली सेवा मंडळाच्या चैत्रीय नवरात्रानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. श्रीहरी अणे यांच्या व्याख्यानाचेही आयोजन यादरम्यान करण्यात आले आहे.

| April 26, 2013 03:33 am

जय महाकाली सेवा मंडळाच्या चैत्रीय नवरात्रानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. श्रीहरी अणे यांच्या व्याख्यानाचेही आयोजन यादरम्यान करण्यात आले आहे.
वध्र्यालगत धाम नदीच्या कुशीत वसलेल्या महाकाली मंदिराचा पौराणिक वारसा सांगितला जातो. निसर्गरम्य परिसरातील या मंदिरातील देवीप्रतिमांमुळे दक्षिणेतील वैष्णोदेवी म्हणूनही त्याची ओळख अलिकडच्या काळात झाली आहे. क वर्ग प्राप्त झालेल्या या तीर्थक्षेत्रास शासनातर्फे अद्याप विविध सुविधा मिळालेल्या नाहीत. सेवा मंडळाने भाविकांसाठी निवास, पाणी व प्राथमिक सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत.
मंडळाचे अध्यक्ष शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी चैत्रीय नवरात्रानिमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती पत्रकार परिषदेत दिली. आज सकाळी घटस्थापनेने उत्सवास प्रारंभ झाला आहे. ३० एप्रिलपर्यंत पूजा, कीर्तन, अखंड आरती व अन्य उपक्रम होतील. भक्त व नागरिकांसाठी २६ एप्रिलला अ‍ॅड. श्रीहरी अणे यांचे सायंकाळी ६ वाजता अग्निहोत्री विद्या संकुलात व्याख्यान होईल. विदर्भाचा सर्व बाजूने आढावा घेणारे विचार अ‍ॅड. अणे हे विदर्भाची व्यथायुक्त सत्यकथा, या विषयावर मांडणार आहे.
याप्रसंगी विधिज्ञ अ‍ॅड. आनंद परचुरे व शंकरप्रसाद अग्निहोत्री यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
१ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण असून महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात आर्थिक उपक्रम व रोजगार संधी या अनुषंगाने पॉवरपॉईट प्रेझेंटेशनचा उपक्रम सादर होईल. कामगार दिनाचे औचित्य साधून संस्थेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वार्षिक योगदानाबद्दल सत्कार केला जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2013 3:33 am

Web Title: speech by shreehari ane
Next Stories
1 पेंचमधील गरीब आदिवासींच्या ‘गोंडी नृत्याला लाखाचे मोल!
2 ठोक आणि किरकोळ व्यापाऱ्यांत फूट
3 गावक ऱ्यांनी कोंडून जाळलेल्या बिबटय़ाच्या पिल्लाचा अखेर मृत्यू
Just Now!
X