24 November 2017

News Flash

‘जागतिकीकरण आणि आपले महिन्याचे बजेट’ या विषयावर गिरीश कुबेर यांचे व्याख्यान

वसई येथील मराठी वाङ्मय मंडळातर्फे येत्या १७ फेब्रुवारी रोजी ‘जागतिकीकरण आणि आपले महिन्याचे बजेट’

प्रतिनिधी, मुंबई | Updated: February 14, 2013 12:35 PM

वसई येथील मराठी वाङ्मय मंडळातर्फे येत्या १७ फेब्रुवारी रोजी ‘जागतिकीकरण आणि आपले महिन्याचे बजेट’ या विषयावर ‘लोकसत्ता’चे व्यवस्थापकीय संपादक गिरीश कुबेर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
काँग्रेस भवन, पारनाका, वसई येथे दुपारी ४ ते ६ या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमास वसईकर नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले        आहे.
कार्यक्रमासाठी सर्वाना विनामूल्य प्रवेश आहे. अधिक माहितीसाठी प्रा. मेधा हरपनकर यांच्याशी ०२५०-२३२३११० या क्रमांकावर संपर्क साधावा.

First Published on February 14, 2013 12:35 pm

Web Title: speech on globalisation and our month budget by girish kuber