News Flash

नूतन विद्यामंदिर मैदानी स्पर्धेत सर्वसाधारण विजेते

देवळाली कॅम्पच्या नूतन विद्यामंदिरने सिन्नर तालुका हौशी अ‍ॅथलेटिक संघटनेच्या वतीने आयोजित नवव्या जिल्हास्तरीय मैदानी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. नाशिकरोड येथे झाले

| January 17, 2013 01:11 am

देवळाली कॅम्पच्या नूतन विद्यामंदिरने सिन्नर तालुका हौशी अ‍ॅथलेटिक संघटनेच्या वतीने आयोजित नवव्या जिल्हास्तरीय मैदानी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद मिळविले.
नाशिकरोड येथे झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन भारत पेट्रोलियन कॉर्पोरेशनचे प्रबंधक एल. एन. नागरे यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक प्रताप मेहरोलिया, नगरसेवक आर. डी. धोंगडे, तुलसी आय हॉस्पिटलचे संचालक मेजर डी. के. झरेकर, बिटको महाविद्यालयाचे प्राचार्य राम कुलकर्णी, नगरसेविका कोमल मेहरोलिया, सिन्नर तालुका हौशी अ‍ॅथलेटिक संघटनेचे सचिव बाळासाहेब लोंढे, संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेत एकूण ४२ शाळांनी सहभाग घेतला. या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुलजार कोकणी (नगरसेवक) यांच्या हस्ते करण्यात आले. बक्षिस वितरणाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, प्रशांत दिवे, क्रिष्णा पांडे (नाशिक जिल्हा अ‍ॅथलेटिक असोसिएशन), अविनाश पगारे (नाशिक जिल्हा अ‍ॅथलेटिक असोसिएशन) वरील मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरणाचा कार्यक्रम झाला. मुलांमध्य मौजे सुकेणे येथील के. आर. टी. हायस्कूल उपविजेते तर मुलींमध्ये नाशिकचे विखे पाटील मेमोरियल स्कूल ठरले.

विभागीय बुद्धिबळ व कॅरम स्पर्धेत  शासकीय पॉलिटेक्निक विजेते
प्रतिनिधी, नाशिक

नाशिकच्या शासकीय पॉलिटेक्निकने येथील संदीप फाऊंडेशनमध्ये महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित बुद्धिबळ व कॅरमच्या विभागीय स्पर्धेत विजेतेपद मिळविले.
स्पर्धेचे उद्घाटन विक्रीकर विभागाचे सहाय्यक आयुक्त सी. एम. मंचरे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी संदीप पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रशांत पाटील, विभाग प्रमुख प्रा. एस. एस. राऊत, प्रा. एम. व्ही. राव, प्रा. एस. ए. शुक्ला, प्रा. यु. ओ. अग्रवाल, प्रा. एस. ए. जाधव आदी उपस्थित होते.
संदीप पॉलिटेक्निक उपविजेते ठरले. बुध्दिबळसाठी मुख्य पंच म्हणून प्रा. योगेंद्र पाटील यांनी काम बघितले. कॅरमचे मुख्य पंच म्हणून विवेक नांदुर्डीकर यांनी काम बघितले. विजेत्या संघाना प्राचार्य प्रशांत पाटील यांच्या हस्ते बक्षिस देण्यात आले.

धनलक्ष्मी विद्यामंदिराचे यश
प्रतिनिधी, नाशिक

पाथर्डीफाटा येथील मानवधन सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था संचलित धनलक्ष्मी बालविद्या मंदीर व प्राथमिक शाळेतील कराटेपटुंनी
सटाणा येथे झालेल्या राज्यस्तरीय खुल्या कराटे स्पर्धेत यश संपादन
केले. आर्यन कराटे स्पोर्ट्स
अकॅडमी व यशवंतनगरी यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेत शाळेतील ऋषिकेश चौधरीने २१ ते २५ किलो वजन गटात कुमिते प्रकारात सुवर्ण मिळविले. तर अक्षय नवले, पूनम नवले, सार्थक पोटे यांनी रौप्य व दिव्या बोराडेने कांस्यपदक मिळविले. स्पर्धेत सुमारे ३०० स्पर्धक सहभागी झाले होते.
यशस्वी विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षक प्रविण सानप यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचा शाळेचे अध्यक्ष प्रकाश कोल्हे, मुख्याध्यापिका ज्योती कोल्हे, अश्विनी कुलकर्णी यांनी सत्कार केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2013 1:11 am

Web Title: sports news in nashik
टॅग : Nashik,Sports
Next Stories
1 विद्यार्थ्यांनी नैतिक मूल्यांची जोपासना करावी- पोलीस आयुक्त
2 निवृत्ती धोंगडे ‘बॉडी झोन श्री’
3 तपोवन अजूनही वनातच
Just Now!
X