नांदेड-वाघाळा मनपा स्थायी समिती सभापती गणपत धबाले यांच्यासह ८ सदस्य निवृत्त झाले.
सभापती गणपत धबाले यांच्या अध्यक्षतेखाली स्थायीच्या सभागृहात बठक झाली. बठकीत स्थायीचे १६ पकी ८ सदस्य निवृत्त होणार होते. त्यानुसार ८ चिठ्ठय़ा काढण्यात आल्या. सभापती धबाले, फारूख अली खाँ, कमलाबाई मुदिराज, अब्दुल लतीफ अब्दुल मजित, तहसीन बेगम अब्दुल समद, सतीश शेषेप्पा राखेवार (सर्व काँग्रेस), कुरेशी चाँदपाशा खाजा (एमआयएम) व अंजली सुरेशराव गायकवाड (संविधान पार्टी) यांच्या चिठ्ठय़ा निघाल्या. धबालेंसह आठ सदस्यांना प्रशासनातर्फे निरोप देण्यात आला. धबाले यांचा कार्यकाळ १ डिसेंबरला संपणार आहे. तत्पूर्वीच त्यांना बठक घेण्याचा अधिकार आहे. मात्र, स्थायी सभापतींवर पायउतार होण्याची वेळ आली. येत्या २५ नोव्हेंबरला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत ८ सदस्यांची निवड केली जाणार आहे. त्यानंतर सभापतींची निवडणूक पार पडेल. स्थायी सदस्यपदासाठी वर्णी लागावी, यासाठी काँग्रेस नगरसेवकांत स्पर्धा लागली आहे. काही नगरसेवकांनी आमदारांमार्फत माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्याकडे शिफारस केली आहे.