News Flash

राज्य नाटय़ स्पर्धेची अंतिम फेरी पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके नाटय़गृहात होणार

महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय़ स्पर्धेची अंतिम फेरी पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाटय़गृहात रंगणार आहे.

| January 13, 2015 07:47 am

महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय़ स्पर्धेची अंतिम फेरी पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाटय़गृहात रंगणार आहे. १६ फेब्रुवारी ते १३ मार्च या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेत एकवीस विभागीय केंद्रांमधून पहिली आलेली विविध नाटके रसिकांना पाहायला मिळणार आहेत.
राज्यातील १९, दिल्ली आणि गोवा केंद्रावरून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण २१ नाटके अंतिम फेरीत सादर होणार आहेत.
अनेक नवे विषय, जुन्या संहिता, जुन्या गाजलेल्या नाटकांचा वेगळा आविष्कार, महाविद्यालयीन रंगभूमीवरून आलेले युवा रंगकर्मी, व्यावसायिक व प्रायोगिक रंगभूमीवरील रंगकर्मीचा सहभाग हे यंदाच्या स्पर्धेचे खास वैशिष्टय़ ठरले. राज्य नाटय़ स्पर्धेचे यंदा ५४ वे वर्ष आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2015 7:47 am

Web Title: state drama competition final round in panvel
टॅग : Loksatta,News,Panvel
Next Stories
1 महावितरणच्या गलथानपणामुळे उरणकर यमदूतांच्या छायेत
2 नवी मुंबई शिवसेना जिल्हाप्रमुख चौगुले यांचा अखेर राजीनामा
3 पनवेलकरांचा खड्डेमय प्रवास कधी संपणार?
Just Now!
X