21 October 2020

News Flash

राज्य नाटय़ स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे उद्या पारितोषिक वितरण

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे महाराष्ट्र राज्य नाटय़ महोत्सवांतर्गत प्राथमिक फेरीचा नाशिक विभागाचा पारितोषिक वितरण सोहळा रविवारी सायंकाळी सहा वाजता येथे होणार आहे.

| June 14, 2014 07:31 am

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे महाराष्ट्र राज्य नाटय़ महोत्सवांतर्गत प्राथमिक फेरीचा नाशिक विभागाचा पारितोषिक वितरण सोहळा रविवारी सायंकाळी सहा वाजता येथे होणार आहे. या वेळी नाशिक, जळगाव आणि अहमदनगर या स्पर्धा केंद्रांवरील प्राथमिक फेरीत पारितोषिक मिळविणाऱ्या कलाकारांना सन्मानित केले जाईल.
परशुराम साईखेडकर नाटय़गृहात हा कार्यक्रम होईल. हौशी कलावंतांना महाराष्ट्र शासनाचा मोफत रंगमंच उपलब्ध व्हावा व हौशी कलाकारांनी सादर केलेल्या कलाकृती रसिकांना पाहता याव्यात, कलाकारांचा गुणात्मक विकास व्हावा, त्यांच्या सृजनशील दृष्टीने रंगभूमी समृद्ध करावी, या उद्देशाने शासन राज्य नाटय़ स्पर्धेचे आयोजन करते. नाशिक विभागातील प्राथमिक फेरीत पारितोषिकप्राप्त कलावंतांना नाटय़ क्षेत्रातील ज्येष्ठ रंगकर्मीच्या हस्ते प्रमाणपत्र, रौप्यपदक व धनादेश देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट नेपथ्य, प्रकाश योजना, दिग्दर्शन, रौप्यपदके आणि अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे वितरीत केली जातील. पारितोषिक वितरण सोहळ्यात रंगबहार सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात आले आहे. या कार्यक्रमात नाटय़ प्रशिक्षणावर आधारित प्रहसन कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. त्याची संकल्पना व दिग्दर्शन नवीद इनामदार यांची आहे, तर लेखन विश्वेश जोशी व नवीद इनामदार यांचे आहे. कार्यक्रमाचा नाटय़ रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक आशुतोष घोरपडे यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2014 7:31 am

Web Title: state drama contests primary stage prize distribution tomorrow
टॅग Drama,Nashik
Next Stories
1 नको ‘एलबीटी’.. नको जकात.. व्हॅटमध्ये लावा अधिभार
2 संत निवृत्तिनाथ पालखीचे त्र्यंबकहून प्रस्थान
3 उच्च न्यायालयाचा प्रश्न : गोदा प्रदूषण मुक्तीसाठी कोणती तरतूद केली
Just Now!
X