News Flash

देशव्यापी संपात राज्य सरकारी कर्मचारी सहभागी होणार- खोंडे

कामगार हिताच्या विरोधात केंद्र सरकार राबवत असलेल्या धोरणांचा निषेध म्हणून २० व २१ फेब्रुवारीला दोन दिवसांचा देशव्यापी लाक्षणिक संप होणार आहे. राज्य सरकारी नोकर संयुक्त

| February 14, 2013 02:11 am

कामगार हिताच्या विरोधात केंद्र सरकार राबवत असलेल्या धोरणांचा निषेध म्हणून २० व २१ फेब्रुवारीला दोन दिवसांचा देशव्यापी लाक्षणिक संप होणार आहे. राज्य सरकारी नोकर संयुक्त संघही यात सहभागी होणार आहे.संघाचे सरचिटणीस योगीराज खोंडे यांनी ही माहिती दिली. देशातील ११ राष्ट्रीय संघटना, सर्व क्षेत्रातील स्वतंत्र संघटना तसेच केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे हा लाक्षणिक संप पुकारला आहे. त्यात प्रामुख्याने विदेशी भांडवलाच्या जोरावर देशातील कामगारांच्या निवृत्ती वेतन योजनेचे खासगीकरण करण्याच्या सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारचा हा नियोजित कायदा मंजूर झाला तर निवृत्ती वेतन योजनेतंर्गत जमा होणारी सर्व रक्कम शेअरबाजार व म्युच्यूअल फंडात गुंतवली जाणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांच्या सेवेतून निवृत्त होणाऱ्यांचे भवितव्य त्यांनीच जमा केलेल्या रकमेवर शेअर बाजारात काय भाव मिळेल त्यावर अवलंबून राहणार आहे अशी माहिती खोंडे यांनी दिली.
याशिवाय किमान वेतन मर्यादा महिना १० हजार रूपये करावी, सरकारी अधिकारी, कर्मचारी यांच्यावर हल्ला करणाऱ्या, राजकीय दबाव आणणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करावेत, सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण थांबवावे, पाच दिवसांचा आठवडा करावा व निवृत्तीचे वय ६० करावे, रिक्त जागा त्वरीत भराव्यात, व्यवसाय कराच्या रूपाने जमा होणारा निधी महसूल निधीत न ठेवता विशेष निधी असा दर्जा देऊन राखीव ठेवावा व त्यातून फक्त रोजगार निर्मितीचेच काम करावे अशाही अनेक मागण्या असल्याचे खोंडे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2013 2:11 am

Web Title: state governament workers will participate in national level strick khonde
टॅग : Strick
Next Stories
1 नगरला पावसाची हजेरी
2 दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारी कर्मचारी देणार एक दिवसाचे वेतन
3 सायबर गुन्हे रोखण्यासाठी पोलीस तत्पर- बकाळे
Just Now!
X