30 September 2020

News Flash

राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेस १८ जानेवारीपासून सुरुवात

सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समितीच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या या वर्षीच्या २०व्या राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेस १८ जानेवारीपासून सुरुवात होत असून, या वर्षी स्पर्धेत

| December 26, 2012 09:00 am

सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समितीच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या या वर्षीच्या २०व्या राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेस १८ जानेवारीपासून सुरुवात होत असून, या वर्षी स्पर्धेत २५ पारंपरिक, तर १४ व्यावसायिक कलावंत गट सहभागी होत असल्याची माहिती स्पर्धाप्रमुख जयसिंह मोहिते पाटील यांनी दिली.
अकलूजच्या स्मृतिभवनामध्ये या स्पर्धा होत असून त्यामध्ये पारंपरिक गटात नंदा, प्रमिला, संगीता लोदगेकर नटरंग कला केंद्र ग्रुप पार्टी, श्यामल सुनीता लखनगावकर मोडनिंब, अलका कल्पना रुईकर राजश्री कला केंद्र जामगाव बार्शी, शांता, कांता भातंगळीकर राधिका कला केंद्र बार्शी, रुक्मिणी अर्चना ज्योत्स्ना पद्मिनी कोल्हापूरकर रेणुका सांस्कृतिक कला केंद्र अंबपवाठार, सरगम कला केंद्र ग्रुप पार्टी वडगाव वाठार, लक्ष्मी सांस्कृतिक कला केंद्र उजळाईवाडी, लक्ष्मी वैशाली भाग्यश्री कोल्हापूरकर रेणुका कला केंद्र गोकुळ शिरगाव, अलका जामखेडकर जय अंबिका कला केंद्र जामखेड, इंदू मनीषा अनिता साळेगावकर ग्रुप पार्टी पिंजरा सांस्कृतिक कला केंद्र वेळे, पूजा कला केंद्र ग्रुप पार्टी सणसवाडी, त्रिमूर्ती कला केंद्र ग्रुप पार्टी साबळेवाडी, लोकनाटय़ सांस्कृतिक कला केंद्र ग्रुप पार्टी रामेगाव, साईनाथ लोकनाटय़ कला केंद्र ग्रुप पार्टी रामेगाव, सरस्वती लोकनाटय़ कला केंद्र ग्रुप पार्टी लातूर, श्री लक्ष्मी सांस्कृतिक लोकनाटय़ कलामंदिर बुधोड लातूर, राधिका सांस्कृतिक कला केंद्र ग्रुप पार्टी सिंधाळा लातूर, बेबी शमी परभणीकर, राजलक्ष्मी कला केंद्र जामगाव, तर व्यावसायिक गटात ‘तुमच्यासाठी काय पण’ योगेश देशमुख पुणे, ‘आली लावणीची राणी’ विजय पालव मुंबई, ‘लावण्यखाणी’ नागेश साळुंखे सोलापूर, ‘नटखट सुंदरा’ प्रदीप शिंपी मुंबई, ‘नखरेल नारी’ कीर्ती देशमुख, सारिका नगरकर, पुणे. ‘िभगरी’ श्याम भगत मुंबई, ‘कैरी मी पाडाची’ शलाका पुणेकर, महेंद्र बनसोडे पुणे. ‘करंट ४४०’ भारती पाटील, पुणे. ‘हा नाद खुळा’ प्रमोद कांदळकर मुंबई, ‘सोळा शंृगार लावणीचा’ नीता मनीषा नाशिककर, नाशिक, ‘ही शुक्राची चांदणी’ रामचंद्र चौधरी सोलापूर, ‘साद लावण्यांचा नाद घुंगरांचा’ नलिनी सुरगुडे पुणे या संघांनी सहभाग नोंदविला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2012 9:00 am

Web Title: state level lavani mahotsav started from 18 jan in solapur
Next Stories
1 अन्नधान्य, रॉकेलच्या अपुऱ्या पुरवठय़ाबाबत कोल्हापुरात नाराजी
2 ‘राजकीय इच्छाशक्ती असेल तर क्षयरोगावर नियंत्रण मिळविणे शक्य’
3 तरुणाईसाठी रक्तदान शिबिरासह पदभ्रमण मोहिमेद्वारे नववर्षांचे स्वागत!
Just Now!
X