महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत जिल्हा माहिती कार्यालयाच्या सहकार्याने नागपुरात २७ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी सभागृहात ग्रंथोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.
ग्रंथोत्सव २०१३ च्या जिल्हा आयोजन समितीच्या बैठक नुकतीच झाली. ग्रंथविक्रेते, वाचक व लेखकांनी सहकार्य करून ग्रंथोत्सव यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी बैठकीत केले. बैठकीला विदर्भ साहित्य संघाचे प्रतिनिधी प्रकाश एदलाबादकर, शासकीय विभागीय ग्रंथालयाच्या ग्रंथपाल कविता महाजन, मराठी भाषा विभागाचे विभागीय सहाय्यक भाषा संचालक ललित डोनीकर, जिल्हा ग्रंथपाल र.चं. नलावडे, जिल्हा परिषदेचे (माध्यमिक) शिक्षणाधिकारी नि.अ. ठमके, नागपूर महानगरपालिकेचे (माध्यमिक) शिक्षणाधिकारी अशोक टालाटुले, समन्वयक सुधीर कोरमकर, शासकीय मुद्रणालयाचे सहाय्यक व्यवस्थापक सुरेश मेश्राम, साहित्य प्रसार केंद्राचे मकरंद कुळकर्णी, ज्ञानेश प्रकाशनचे डॉ. भालचंद्र काळे, विदर्भ साहित्य संघाचे व्यवस्थापक प्रदीप मोहिते, अनिल बुक एजन्सीचे टांकसाळे उपस्थित होते.
 २७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिवस असल्यामुळे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यासंदर्भात झालेल्या बैठकीत ही चर्चा करण्यात आली. या ग्रंथोत्सवात अधिकाधिक वाचकांनी भेट देणे व ग्रंथ विक्री होण्यासाठी महापालिका तसेच शिक्षण विभागाकडून सर्व शाळांना परिपत्रके पाठवून शिक्षक व विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी केले आहे.