20 September 2020

News Flash

राज्यव्यापी उद्योजक महिला परिषद

‘आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान’ या संस्थेतर्फे शनिवार ७ मार्च रोजी राज्यव्यापी उद्योजक महिला परिषद, राजा शिवाजी विद्यालयाच्या बी. एन. वैद्य सभागृह

| March 3, 2015 06:09 am

‘आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान’ या संस्थेतर्फे शनिवार ७ मार्च रोजी राज्यव्यापी उद्योजक महिला परिषद, राजा शिवाजी विद्यालयाच्या बी. एन. वैद्य सभागृह, हिंदू कॉलनी, दादर येथे सकाळी ९ ते ६ या वेळेत भरविण्यात येत आहे.
सकाळी ९ वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून या वेळी आदित्य बिर्ला ग्रुपच्या राजश्री बिर्ला, महाराष्ट्राच्या महिला आणि बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे-पालवे, महाराष्ट्राच्या उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्र, सारस्वत को-ऑप. बँक लि.चे उपाध्यक्ष गौतम ठाकूर आणि रश्मी ठाकरे उपस्थित राहणार आहेत. सकाळी ११ वाजताचे पहिले सत्र शासकीय योजना आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांचे अनुभवकथन आणि दुपारचे दुसरे सत्र उद्योगाचे तंत्र आणि मंत्र या विषयाचे असून त्यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन होईल. तसेच निर्मात्या नीना राऊत आणि गायिका वैशाली सामंत यांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती असेल. ‘आम्ही उद्योगिनी’ पुरस्कार वितरण समारंभ पार पडणार आहे. संपर्क : ०२२-२४३०९५०७ / ९७०२७१२९३२.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2015 6:09 am

Web Title: statewide conference for women entrepreneurs
Next Stories
1 एनटीसीला शहरात टीडीआर
2 दहिसरचा आरक्षित भूखंड ताब्यात घेण्यास सभागृहाची मंजुरी
3 महिलांचा विनयभंग करणारा तोतया पोलीस गजाआड
Just Now!
X