27 November 2020

News Flash

पुतळ्यांना निधी देण्याबाबत समिती नेमून निर्णय- ओझा

शहरात विविध ठिकाणी महापुरुषांचे १० पुतळे बसविण्यास १ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर करावा, असा ठराव मनपाच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात आला.

| June 23, 2013 01:10 am

शहरात विविध ठिकाणी महापुरुषांचे १० पुतळे बसविण्यास १ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर करावा, असा ठराव मनपाच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात आला. या अनुषंगाने आपल्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून निर्णय घेतला जाईल, असे महापौर कला ओझा यांनी जाहीर केले. छत्रपती शिवाजीमहाराजांचे तैलचित्र सभागृहात लावले नसल्याबद्दलही नगरसेवकांनी सत्ताधारी शिवसेना-भाजप पदाधिकाऱ्यांचा सभेत निषेध केला.
शहराच्या शिवाजीनगर भागात प्रभाग ९९ मध्ये शिवाजीमहाराजांचा पुतळा बसवावा, अशी मागणी करण्यात आली. या पुतळ्यासाठी २५ लाख तरतूद करावी, असेही नमूद करण्यात आले. प्रभाग २४ मध्ये लोककवी वामनदादा कर्डक, प्रभाग ९५ मध्ये महाराणा प्रताप, याच प्रभागात पद्मपुरामध्ये संत रोहिदासमहाराज, एन ५ व एन ६ मधील चिश्तीया पोलीस चौकीसमोर लोकमान्य टिळक, संत तुकाराम नाटय़गृहासमोर तुकाराममहाराज, अजबनगर (खोकडपुरा) येथील राधामोहन कॉलनीत लोकमान्य टिळक, ज्योतीनगर भागात विश्वरूप हॉलसमोर थोरले बाजीराव पेशवे, नागेश्वरवाडी येथील सारस्वत बँकेसमोर बाजीप्रभू देशपांडे, तर मनपा मुख्यालयासमोर संत गाडगेबाबा यांचा पुतळा बसविण्यास मंजुरी द्यावी, अशी मागणी असणारे १० ठराव सभेसमोर ठेवण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2013 1:10 am

Web Title: statue grant get decision to appoint committee oza
टॅग Statue
Next Stories
1 शाळांच्या तपासणीचा आदेश
2 ‘साखरमाये’ची टँकरवाडय़ाशी सोयरिक
3 क्रिकेटमधील ‘विजय’!
Just Now!
X