News Flash

आरटीईतील २५ टक्के आरक्षण दुप्पट जागा शिल्लक असतानाही दीड हजार बालक प्रवेशापासून वंचित

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) वंचित व दुर्बल घटकांतील बालकांच्या २५ टक्के आरक्षणाच्या ३ हजारांहून अधिक जागा अजूनही शिल्लक आहेत तर दुसरीकडे

| July 8, 2013 02:10 am

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) वंचित व दुर्बल घटकांतील बालकांच्या २५ टक्के आरक्षणाच्या ३ हजारांहून अधिक जागा अजूनही शिल्लक आहेत तर दुसरीकडे अर्ज करुनही १ हजार ४२३ विद्यार्थी प्रवेशापासुन वंचित आहेत. नगर शहरात प्रवेशापासून वंचित राहिलेल्या बालकांची संख्या २९१ आहे. शैक्षणिक वर्ष सुरु होऊन महिना होत आला तरी शिक्षण विभागाने त्यांच्या प्रवेशासाठी प्रयत्न केलेले नाहीत.
प्राथमिक शिक्षणाधिकारी दिलिप गोविंद यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी २५ टक्क्य़ांतील रिक्त राहिलेल्या जागांवर शिक्षण संस्थांना पूर्व परवानगी शिवाय इतरांना प्रवेश देता येणार नाही तसेच प्रवेशासाठी अर्ज असूनही जागा शिल्लक असतील तर संस्थांवर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. काही अधिकाऱ्यांच्या म्हणन्यानुसार प्रवेशासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत आहे. आरटीईनुसार पुर्व प्राथमिक व प्राथमिकच्या वर्गात वंचित व दुर्बल घटकांतील बालकांना मोफत प्रवेशासाठी २५ टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. त्याचे यंदाचे दुसरे वर्षे आहे.
प्राथमिक शिक्षण विभागाकडुन मिळालेल्या माहितीनुसार २५ टक्क्य़ांप्रमाणे जिल्ह्य़ातील सर्व प्रकारच्या अनुदानित शाळांतुन पुर्व प्राथमिकच्या १ हजार ९९२ व प्राथमिकच्या ३ हजार ६७४ अशा एकूण ५ हजार ६६६ प्रवेश क्षमता उपलब्ध आहे. शहर हद्दीत ही संख्या २ हजार ५१५ (नगर शहरात १ हजार ६९२) आहे. प्रवेशासाठी अनुक्रमे १ हजार १४२ व २ हजार ५४ असे एकूण ३ हजार १९६ विद्यार्थ्यांच्या पालकांनी अर्ज केले होते. प्रवेश क्षमतेपेक्षा कमी अर्ज येऊनही शिक्षण विभाग अनुक्रमे ९१४ व १ हजार ६५९ अशा एकूण २ हजार ५१३ विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकले आहेत.
नगर शहरासह कोपरगाव, राहाता, श्रीरामपुर, संगमनेर तालुक्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातही प्रवेशापासुन वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. अनेक ठिकाणी प्रवेश क्षमता शिल्लक असुनही तसेच प्रवेशापासुन विद्यार्थी वंचित असतानाही शिक्षण संस्थांनी प्रवेश दिलेले नाहीत. त्यामुळे २५ टक्के आरक्षणाच्या विषयावर शिक्षणाधिकाऱ्यांनी आढावा घेण्याची आवश्यकता व्यक्त केली जाते. शिल्लक राहिलेल्या प्रवेशाच्या जागांवर देणगी घेऊन प्रवेश देण्यासाठीही शिक्षण संस्थाचालकांचे प्रयत्न आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2013 2:10 am

Web Title: still 1500 children away from school admission in nagar
Next Stories
1 कार्याध्यक्षपदावरुन शरद राव निलंबित रिक्षा चालकांचे १८जुलैला ‘जागर धरणे’
2 राजकारणाला समाजकारणाची किनार ठेवली तरच समाजात बदल घडेल
3 सोलापूर पालिकेचा कारभार रुळावर येण्यासाठी गुडेवार यांना पाचारण
Just Now!
X