24 September 2020

News Flash

धुळ्याजवळ विदेशी मद्याचा साठा जप्त

विदेशी मद्यांचा साठा असलेले एक हजार २०२ खोके बेकायदेशीरपणे घेऊन जाणारा ट्रक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावरील नगाव शिवारात पकडला. या कारवाईत ट्रकसह

| June 27, 2013 05:46 am

विदेशी मद्यांचा साठा असलेले एक हजार २०२ खोके बेकायदेशीरपणे घेऊन जाणारा ट्रक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावरील नगाव शिवारात पकडला. या कारवाईत ट्रकसह तब्बल ९५ लाखाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. ट्रक चालकाला अटक झाली असून न्यायालयाने त्याला नऊ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
सोमवारी रात्री मुंबई-आग्रा महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला होता. नाशिककडून येणारा  एक ट्रक थांबवून तपासणी केली असता ट्रकमध्ये विदेशी बनावटीचे मद्य असलेले एक हजार २०२ खोके आढळले. चालक मखनसिंग तारासिंग खजाना यास अटक करण्यात
आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2013 5:46 am

Web Title: stock of wine seize at dhule
टॅग Dhule,Seize,Stock
Next Stories
1 खान्देश मिल कामगारांच्या पदरी निराशाच ‘राजमुद्रा’ कडून न्यायालयीन निर्णयाचा अवमान
2 विकासाच्या वाटेवर उत्तर महाराष्ट्र
3 ‘सावाना’चे कलादालन जमीनदोस्त
Just Now!
X