03 April 2020

News Flash

सोलापूरच्या दोघा सराफांची १२ लाखांची बॅग पळविली

स्वस्तात सोन्याचे आमीष दाखवून सोलापूरच्या दोन सराफांची १२ लाखांची बॅग भरदिवसा पळविण्यात आली. भूम तालुक्यातील माणकेश्वर-देवंग्रा परिसरात हा प्रकार घडला.

| February 19, 2014 02:40 am

स्वस्तात सोन्याचे आमीष दाखवून सोलापूरच्या दोन सराफांची १२ लाखांची बॅग भरदिवसा पळविण्यात आली. भूम तालुक्यातील माणकेश्वर-देवंग्रा परिसरात हा प्रकार घडला.
सोलापूर येथील सराफा व्यापारी हे व्यंकटेश बनसोडे व प्रशांत गायकवाड यांना सोबत घेऊन सोमवारी परंडा शहरात आले. सोन्याचे आमीष दाखविणा-याशी त्यांचे मोबाईलवर बोलणे झाले. सराफास भूम रस्त्याने माणकेश्वर फाटय़ाजवळ येण्यास सांगितले. त्याप्रमाणे व्यापारी व सहकारी इंडिकातून माणकेश्वर परिसरात गेले. तेथे व्यापा-याची गाडी थांबवून त्यांना शेतात नेण्यात आले व त्यांच्याकडील १२ लाख रुपये रोकड असलेली बॅग हिसकावून घेतली. व्यापा-यांना मारहाण करून भामटे शेतात पसार झाले.
माहिती मिळताच भूमचे, तसेच परंडय़ाचे पोलीस तातडीने घटनास्थळी आले. पोलिसांनी एकसष्टया पोपट काळे व एका महिलेस संशयावरून ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीनंतर महिलेस सोडून दिले. काळेविरुद्ध ४ गुन्हे नोंद असल्याने त्याची रवानगी गुन्हे अन्वेषण विभागाकडे करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2014 2:40 am

Web Title: stolen 12 lakh rs bag from saraf of solapur
टॅग Solapur,Stolen
Next Stories
1 महापालिका कर्मचा-यांचे उद्यापासून मुंबईमध्ये धरणे
2 पवार काका-पुतण्याविरोधात दंड थोपटत मुंडेंचे शक्तिप्रदर्शन!
3 राष्ट्रवादीतर्फे पुन्हा पाटील, शिवसेनेचा उमेदवार ठरेना
Just Now!
X