News Flash

महिला गटारात पडून जखमी

कळंबोली येथील रोडपाली परिसरातील सेक्टर २० येथील संपूर्ण पथदिवे बंद आहेत. त्यामुळे सायंकाळी कामावरून घरी परतत असताना दोन महिला पदपथावरून चालताना त्यांचा पाय उघडय़ा गटारात

| September 6, 2014 12:57 pm

कळंबोली येथील रोडपाली परिसरातील सेक्टर २० येथील संपूर्ण पथदिवे बंद आहेत. त्यामुळे सायंकाळी कामावरून घरी परतत असताना दोन महिला पदपथावरून चालताना त्यांचा पाय उघडय़ा गटारात गेल्याने त्या गटारामध्ये पडल्या. त्या किरकोळ जखमी झाल्या.  सायंकाळच्या सुमारास कामावरून घरी परतणाऱ्या पादचाऱ्यांना खड्डे चुकविण्यासाठी पदपथावरून चालण्याचा आधार मिळतो, मात्र येथील पदपथांवरील झाकणे नसल्याने पायी चालणाऱ्यांचे पाय उघडय़ा गटारांमध्ये जाण्याचे प्रकार रोजच घडत आहेत. अशा दोन महिला कामावरून घरी परतत असताना गटारामध्ये पडल्या. सुवर्णा संध्या आणि विद्या कुलकर्णी अशी त्यांची नावे आहेत. सिडकोचे वीज विभागाचे कार्यकारी अभियंता ठाकरे यांच्याशी या समस्येविषयी संपर्क साधल्यानंतर त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात येथील १६ पथदिव्यांपैकी ५ दिवे सुरू केले होते. त्यानंतर हा अपघात झाल्यानंतर रहिवाशांनी सिडको कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांनी संपूर्ण परिसरातील पथदिव्यांची वीज रोहित्राच्या बिघाडामुळे गेल्याचे सांगितले. याबाबत सिडकोचे वीज विभागाचे अधीक्षक अभियंता दीपक चव्हाण यांना या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी लवकरच येथील परिसरातील वीज व्यवस्था सुरळीत करण्याचे आदेश देत असल्याचे सांगितले.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2014 12:57 pm

Web Title: street lights shut results two woman fall into uncovered manhole
टॅग : Sewer
Next Stories
1 गोदामातून चोरीला जाणाऱ्या कंटेनरमुळे देशाच्या सुरक्षेलाच धोका?
2 नवी मुंबई पालिका नापास
3 मांडुळाची तस्करी करणारे तीन अटकेत, चार मांडूळे जप्त
Just Now!
X