News Flash

विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रात नेतृत्व करण्याइतपत यशस्वी व्हावे – मंगेश सांगळे

सध्याचा विद्यार्थी हा खूप प्रगल्भ आहे, त्यामुळे त्याने स्वत:ची क्षमता ओळखत आवडणाऱ्या क्षेत्रातच आपले भविष्य घडवावे आणि तेही त्या क्षेत्राचे थेट नेतृत्व करण्याइतपत यशस्वी व्हावे,

| January 22, 2013 11:26 am

सध्याचा विद्यार्थी हा खूप प्रगल्भ आहे, त्यामुळे त्याने स्वत:ची क्षमता ओळखत आवडणाऱ्या क्षेत्रातच आपले भविष्य घडवावे आणि तेही त्या क्षेत्राचे थेट नेतृत्व करण्याइतपत यशस्वी व्हावे, अशा शुभेच्छा आमदार मंगेश सांगळे यांनी विक्रोळी येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना दिल्या.
विक्रोळी येथील विकास हायस्कूलमध्ये ‘लोकसत्ता यशस्वी भव मार्गदर्शन शिबीर’ आयोजित करण्यात आले होते. विक्रोळी-कांजूरमार्ग विभागातील विद्यार्थ्यांसाठी मंगेश सांगळे यांच्यातर्फे ‘लोकसत्ता यशस्वी भव’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कार्यक्रमास विद्या विकास संस्थेच्या मुख्य अधिकारी विद्या राऊत, विकास करिअर कॉलेजचे प्रमुख विकास राऊत व उत्कर्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक तिवारी, तर अध्यक्षस्थानी ‘लोकसत्ता’चे विशेष प्रतिनिधी संदीप आचार्य उपस्थित होते. संदीप आचार्य यांनीही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ‘लोकसत्ता’चे तज्ज्ञ शिक्षक भोसले यांनी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते यशस्वी भव पुस्तके प्रदान केली. कार्यक्रमाचे नियोजन वाघमारे यांनी केले, तर सूत्रसंचालन जया देशमुख यांनी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2013 11:26 am

Web Title: student should select their interested field to success
Next Stories
1 महिला वाहतूक पोलिसांना कराटेचे प्रशिक्षण
2 परदेशी साक्षीदारांच्या अनुपस्थितीने सोमाली चाच्यांविरुद्धच्या खटल्याला खीळ
3 पॅरासेलिंग
Just Now!
X