09 March 2021

News Flash

वसतिगृह अधीक्षिकेला विद्यार्थिनींनी डांबले

आदिवासी वसतिगृहात कोणत्याच सोयी-सवलती नसल्याच्या तक्रारीची गाऱ्हाणी मांडण्यासाठी निघालेल्या मुलींना मज्जाव करणाऱ्या अधीक्षिकेला वसतिगृहातील विद्यार्थिनींनी डांबून ठेवल्याची घटना येथील शिवाजीनगरातील शासकीय मुलींच्या वसतिगृहात शुक्रवारी घडली.

| December 25, 2012 02:02 am

आदिवासी वसतिगृहात कोणत्याच सोयी-सवलती नसल्याच्या तक्रारीची गाऱ्हाणी मांडण्यासाठी निघालेल्या मुलींना मज्जाव करणाऱ्या अधीक्षिकेला वसतिगृहातील विद्यार्थिनींनी डांबून ठेवल्याची घटना येथील शिवाजीनगरातील शासकीय मुलींच्या वसतिगृहात शुक्रवारी घडली.
या वसतिगृहात मुलींसाठी कोणत्याही सोयी-सुविधा नसल्याने त्याबद्दलची तक्रार करण्यासाठी मुली जेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाल्या होत्या, तेव्हा त्यांना वसतिगृह अधीक्षिका संजीवनी कोकाडे यांनी मज्जाव केला असता संतप्त विद्यार्थिनींनी अधीक्षिकेला एका खोलीत बंद करून कुलूप ठोकले.
यासंबंधीची तक्रार अधीक्षिका संजीवनी कोकाडे यांनी पोलिसात केल्यावरून वडगाव रोड पोलिसांनी ३५ मुलींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2012 2:02 am

Web Title: students closed the hostels headteacher in classroom
Next Stories
1 अनिल पाटील म्हशाखेत्री यांना राज्य पुरस्कार
2 ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांना मैत्री गौरव पुरस्कार
3 ‘जाणता राजा’चे प्रयोग २६ जानेवारीपासून चंद्रपुरात
Just Now!
X