लोकसत्ता यशस्वी भव मुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना एक नवा आत्मविश्वास मिळतो त्यामुळे ते सर्वत्र यशस्वी होतात असे प्रतिपादन पोलादपूर, कापडे बुद्रुक येथील श्री वरदायिनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे विभागप्रमुख गुलाबराव येरुणकर यांनी केले. सेंट्रल बँक ऑफ इंडिया ठाणे विभागाने लोकसत्ताच्या प्रती व यशस्वी भव: पुस्तकांच्या प्रती शाळेतील विद्यार्थ्यांना प्रायोजित केल्या असून त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणारा आत्मविश्वास व शिक्षकांना प्रभावित करणारे लोकसत्तामधील यशस्वी भव:  सदर यामुळे आम्ही ही जबाबदारी उचलल्याचे यावेळी  सेंट्रल बँक ऑफ इंडिया ठाणे योथील क्षेत्रीय प्रबंधक सुनील चव्हाण यांनी सांगितले. याप्रसंगी शाळा समिती अध्यक्ष शी. दौ. सकपाळ, विठ्ठल नाना सलागरे, हरिभाऊ उतेकर, अनिल मोरे, पर्यवेक्षक पवार सर आदी उपस्थित होते. दादर येथील बालमोहन विद्यामंदिर शाळेतील तज्ज्ञ शिक्षक अखिल भोसले यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयासंबंधी पूर्व व मुख्य परीक्षापूर्व तयारी कशी करावी व प्रश्नपत्रिकेचे गुणनिहाय स्वरूप यावेळी समजावून सांगितले.