जिल्ह्य़ातील मरडसगाव ते पाथरी बस बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गरसोय होत आहे. हादगावमाग्रे बस पूर्ववत चालू करावी, या मागणीसाठी माजलगाव-पाथरी रस्त्यावरील आष्टी फाटा येथे शुक्रवारी विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनामुळे माजलगाव व आष्टीकडे जाणारी वाहतूक थांबली होती.
मरडसगावचे विद्यार्थी पाथरी शहरात शिक्षण घेत आहेत. यापूर्वी मरडसगावहून पाथरीला येण्यास एस. टी. बस होती. परंतु ही बस बंद केल्याने विद्यार्थ्यांसह प्रवाशांची मोठी गरसोय झाली आहे. शासकीय पातळीवर मानव विकास अंतर्गत शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने अनेक उपक्रम राबविले जात असताना महामंडळाने मात्र बस बंद करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर गंडातर आणले. मरडसगाव येथील ग्रामस्थांनी ग्रामसभेचा ठराव घेऊन बस सुरू करण्याची मागणी केली. मात्र, एस. टी. प्रशासनाने दखल घेतली नाही. शुक्रवारी सकाळी आष्टी फाटय़ावर विद्यार्थी मोठय़ा संख्येने जमले. त्यांच्यासोबत गावकरीही होते. तासभर रास्ता रोको झाले. नायब तहसीलदार ए. जी. भोबाळे, पोलीस निरीक्षक उत्तम चव्हाण, शिवसेनेचे सुरेश ढगे आदी उपस्थित होते. आगार प्रमुखांनी मात्र रास्ता रोकोच्या ठिकाणी येण्याचे टाळले. विभागीय नियंत्रकाला बस सुरू करण्याबाबत दिलेल्या निवेदनावर गावकरी ज्ञानेश्वर काळे, प्रभाकर काळे, राहुल काळे, सिद्धेश्वर िशदे, सतीश िशदे, नारायण पुरी आदींच्या सह्य़ा आहेत.