शहरातील पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचा सांस्कृतिक महोत्सव दिमाखात पार पडला. या कार्यक्रमामध्ये बालवाडी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त व शंभर टक् के सहभाग होता. नृत्य, नाटिका, भारुड, शिक्षण, पाणीटंचाई, अंधश्रद्धा, आतंकवाद, स्त्रीभ्रूण हत्या, विनोद अशा विविध प्रकारांतील कलाविष्कार यावेळी पाहावयास मिळाला.
महोत्सवाचा समारोप नगराध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील, तहसीलदार नितीन गवळी,   संचालक    पंकज बोरोले यांच्या उपस्थितीत झाला. अ‍ॅड. पाटील यांनी मनोगतात    हा    फक्त    सांस्कृतिक  महोत्सव नसून,   सामाजिक  बांधिलकी जोपासणारा कार्यक्रम असल्याचे सांगितले.
 कलागुणांसोबतच स्पर्धा परीक्षा, क्रीडा प्रकार तसेच विविध क्षेत्रांत यश मिळविणाऱ्या तब्बल ३०० विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. नितीन गवळी यांनी सत्कारार्थी विद्यार्थ्यांच्या संख्येवरून विद्यालयाची गुणवत्ता लक्षात येते, असे नमूद केले.
संस्थेने    राबविलेले उपक्रम, कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन पाहून आपण भारावून गेल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचा जल्लोष, पालकांचा उत्साह,    अनोखी    उपस्थिती,    भव्य    रंगमंच,    प्रकाश व्यवस्था,   सुंदर    नियोजन    हे    या     महोत्सवाचे     वैशिष्टय़ ठरले.
एड्स    निर्मूलन, दहशतवाद, आज का किसान, पृथ्वी वाचवा, मुलगी हीच खरी लक्ष्मी, डेंग्यू, शिरीषकुमार, मुलगाच हवा हा अट्टहास कशाला?, स्त्रीभ्रूण हत्या तसेच बायको कमाल-नवरोबा धमाल अशा नाटिका सादर करण्यात आल्या. प्रास्ताविक मुख्याध्यापक एम. व्ही. पाटील यांनी केले.