अखिल भारतीय सांस्कृतिक संघातर्फे झालेल्या ‘नॅशनल हार्मनी २०१३ महोत्सवात’ कोल्हापूरच्या १९ मुलींनी यश मिळविले. यामध्ये कु. देवश्री सतेज पाटील हिला ‘युवारत्न’ पुरस्कार देण्यात आला. या मुलींना नर्तना स्कूल ऑफ डान्सच्या कविता नायर यांचे मार्गदर्शन लाभले.     
पुणे येथील टिळक स्मारक मंदिरात झालेल्या या महोत्सवात देशभरातील १८ राज्यांतून ८०० मुली सहभागी झाल्या होत्या. कोल्हापूरच्या सहभागी ३० मुलींपैकी १९ मुलींनी महोत्सवात बक्षिसे जिंकून विशेष छाप पाडली. यामध्ये मालविका मेनन आणि प्रियांका शेट्टी यांनी ऑल इंडिया पातळीवर डय़ुअेट मध्ये दुसरातर लहान गटात श्रुतीप्रिया बालाजी हिला तिसरा क्रमांक मिळाला. सोलो गटात साक्षी झंवर, कृष्णा हावळ, प्रियांका शेट्टी, राजलक्ष्मी कदम, रोही ओबेरॉय, प्रणिता शेट्टी, राची माने, नंदिता नायर, सात्त्विका वेर्णेकर, सादीका नरसिंगानी यांनी डय़ुअेट मध्ये तर अनुष्का सरनाईक, सौरवी पाटील, आयुष्का नष्टे, गायत्री जिरगे, प्रणिला शेट्टी, रेवा गंधम यांना चेअरमन प्राइज मिळाले. या सर्व मुली गेल्या ५ ते ८ वर्षांपासून भरतनाटय़मचे शिक्षण गुरू कविता नायर यांच्याकडे घेत आहेत.

kolhapur, bjp mp milind deora
संजय मंडलिकांचा विजय मोदीजींच्या बलशाली भारतासाठी आवश्यक – खासदार मिलिंद देवरा
political fight, murlidhar Mohol, ravindra Dhangekar, pune Metro credit
मेट्रोच्या श्रेयवादावरून मोहोळ- धंगेकर यांच्यात खडाजंगी
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा