विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे परभणी जिल्ह्यासाठी आरोग्य, बांधकाम, शिक्षण व अल्पसंख्याक विभागास भरीव निधी देण्यात आल्याची माहिती राज्यमंत्री फौजिया खान यांनी दिली.
सोनपेठ ग्रामीण रुग्णालय बांधकामासाठी साडेचार कोटींची तरतूद झाली. पहिल्या टप्यात बांधकाम सुरू करण्यास ४५ लाख मंजूर करण्यात आले. रुग्णालयासाठी एक हेक्टर ८० आर जागेस मंजुरी देऊन प्रस्ताव सरकारला सादर करण्यात आला. शहरातील अस्थिव्यंग रुग्णालय व जिंतूरच्या ट्रामाकेअर सेंटरसाठी अत्याधुनिक यंत्रसामुग्री खरेदीस २० लाख निधी मंजूर करण्यात आला.
अल्पसंख्याक कल्याण विभागांतर्गत विविध योजना राबविण्यास ८० कोटींची तरतूद करण्यात आली. पकी ५० कोटी मौलाना आझाद आíथक विकास महामंडळास देण्यात आले. शिवाय ३० कोटी राज्यातील शहरी व ग्रामीण भागात पायाभूत सुविधा राबविण्यासाठी मंजूर केले आहेत.
परभणी जिल्ह्यात अनुसूचित जाती-जमातीच्या मुला-मुलींचे वसतिगृह बांधकामास ८४ लाख तरतूद करण्यात आली. जिल्ह्यात नवीन रस्ते व पूल बांधकामासाठी २३ कोटींची तरतूद केली. सोनपेठ येथील भूमी अभिलेख कार्यालय व पूर्णा येथील न्यायाधीश भवनच्या बांधकामास प्रत्येकी २० लाख निधी मंजूर केला. आरोग्य, शिक्षण, पोषण, जनजागरण व जनसंवाद मोहिमेंतर्गत नागरिकांच्या अडचणी व ग्रामीण भागातील भौतिक समस्या जाणून घेतल्या. त्यानुसार विकासकामासाठी निधी मिळवण्याचा पाठपुरावा केला जात आहे, असे मंत्री खान यांनी सांगितले.