यंदाच्या उसाचा उत्पादन खर्चावर आधारित दर जाहीर करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बारावी ऊस परिषद ८ नोव्हेंबरला जयसिंगपूर येथील विक्रमसिंह मैदानावर होणार आहे. परिषद यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकात बैठका घेतल्या जात असून दीड लाखांहून शेतक ऱ्यांच्या उपस्थितीत दरासाठी आंदोलनाचे रणशिंग फुंकण्याचा इशारा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.
शेट्टी म्हणाले, उसाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे, अशी आग्रही मागणी संघटनेची आहे. उत्पादनावर किती खर्च होतो, शेतक ऱ्याला किती मिळायला हवेत, याचा लेखाजोखा उस परिषदेत मांडला जातो आणि मगच दर ठरविला जातो. कारखान्यांना उपपदार्थामधून चांगला नफा झाला आहे. यातून दुसरा हप्ता द्यावा. एफआरपी म्हणजे शुद्ध फसवणूक आहे. उसाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा, यासाठी आपला लढा आहे. ऊस परिषदेपूर्वी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात दौरे करणार असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 22, 2013 1:30 am