शेटफळ (ता. इंदापूर, जि. पुणे) येथे ठेकेदाराने जबरदस्तीने डांबून ठेवलेल्या एका आदिवासी कुटुंबाची लोकाधिकार आंदोलनाच्या नगर जिल्हय़ातील पदाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने सुटका केली.
ऊसतोडणी कामगार असलेल्या या कुटुंबाला सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ अत्यंत कमी मोबदल्यात व नंतर फुकट काम करावे म्हणून डांबून ठेवण्यात आले होते असे आंदोलनाचे पदाधिकारी विजय काळे यांनी सांगितले. महिला व लहान मुलांचाही या कुटुंबात समावेश असून त्या सर्वाची सुटका करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. भिगवण पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक वाघमोडे, पाटील, अजित शेख, ठाणे अंमलदार नामदेव शिंदे यांनी यासाठी आंदोलनाला मदत केली असे त्यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 29, 2013 1:04 am