News Flash

सुरेश शिवगोंडा पाटील यांचे अपघाती निधन

भरधाव ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने भाजपचे हातकणंगले तालुका उपाध्यक्ष सुरेश शिवगोंडा पाटील हे ठार झाले. हा अपघात हातकणंगले-पेठवडगाव मार्गावर मंगळवारी रात्री उशीरा झाला.

| January 30, 2013 07:58 am

भरधाव ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने भाजपचे हातकणंगले तालुका उपाध्यक्ष सुरेश शिवगोंडा पाटील हे ठार झाले. हा अपघात हातकणंगले-पेठवडगाव मार्गावर मंगळवारी रात्री उशीरा झाला.    
तारदाळ (ता.हातकणंगले) येथे राहणारे सुरेश पाटील व श्यामराव मल्लाप्पा केसरे हे दोघे कामानिमित्त मोटारसायकलने पेठवडगाव येथे गेले होते. काम झाल्यानंतर ते घरी परतत होते. वडगाव-हातकणंगले मार्गावर आळते गावाजवळील मदरशानजीक रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास अज्ञान भरधाव ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यामध्ये पाटील गंभीर जखमी झाले. त्यांना इचलकरंजीतील आय.जी.एम इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या वेळी पाटील यांचे नातेवाईक, कार्यकर्त्यांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. अपघातातील जखमी श्यामराव केसरे यांच्यावर याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2013 7:58 am

Web Title: suresh shivgonda patil killed in accident
Next Stories
1 इचलकरंजी नगरपालिकेची अतिक्रमण विरोधी मोहीम
2 ‘संविधान भारतीयांना जोडणारा धागा’
3 अहवाल स्पर्धेत ‘गोकुळ’ प्रथम
Just Now!
X