तालुक्यातील पोहेगाव ग्रामपंचायतीत औताडेंच्या स्वाभिमानी विकास आघाडीने बारा जागा, आमदार अशोक काळे गटाने तीन जागा जिंकल्या तर कोल्हे गटास एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. तर धोत्रे ग्रामपंचायतीत आमदार काळे गटास पाच, कोल्हे गटास पाच तर एक जागा अपक्षाने जिंकली.
पोहेगाव ग्रामपंचायतीत स्वाभिमान विकास आघाडीने बारा जागा पटकावत निर्विवाद बहुमत मिळवले. त्याबद्दल प्रतिक्रिया देताना अध्यक्ष अशोकराव रोहमारे म्हणाले की, सर्वसामान्य नागरिक मतदार ‘काळे कोल्हे’च्या घाणेरडय़ा राजकारणास वैतागले असून त्यांना आता बदल हवा आहे व त्याची सुरुवात जिल्हा परिषद निवडणुकीत व आता ग्रामपंचायत निवडणुकीत झाली आहे. त्यामुळे आता तालुक्यात परिवर्तन सुरू झाल्याची ही नांदी आहे. लोकांनी भिंगरी व बॉबीला व वाटलेल्या पैशाला बळी न पडता दोघा नेत्यांना जागा दाखवून दिली. काळे-कोल्हेचे तिसरी शक्ती उद्याला न येऊ देण्याचे स्वप्न त्यामुळे भंग पावले.
स्वाभिमानी विकास आघाडीचे विजयी उमेदवार (कंसात मिळालेली मते)
अमोल औताडे (७००), रामनाथ औताडे (६०६) उज्वलाबाई काळे (६६५), चांगदेव शिंदे (४६३), संगीता सोनवणे (४५६), वैशाली औताडे (४८५), अजित औताडे (५६०), सखुबाई सोनवणे (५४३), मंदाबाई औताडे (५२३), रवींद्र भालेराव (४१८) राजेंद्र औताडे (४५२) सुवर्णा शेजवळ (४१८), तर आमदार काळे गटांचे विजयी उमेदवार – विनोद रोहमारे (५२१) बबीता रोहमारे (५०७), अश्विनी औताडे (५३८), कोल्हे गट – निरंक.
धोत्रे ग्रामपंचायतीतील विजयी उमेदवार (कंसात मिळालेली मते)  – मंगल चव्हाण (२६१), नवनाथ जामदार (३२५), ठकुबाई माळवदे (२९६), छाया कोतकर (२९४) छाया फेटे (२०३) )सर्व विजयी आमदार काळे गट). संजय जामदार (२२५), गौसिया शेख (२१८) कुसुमबाई शिंदे (२३५), लक्ष्मण परदेशी (२३२), मनोज चव्हाण (२८५) (सर्व कोल्हे गट). तर तालीब सय्यद (२४६) मते घेऊन अपक्ष निवडून आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार राहुल जाधव यांनी काम पाहिले.