स्वामी विवेकानंद यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त रामकृष्ण मठ, पुणे व श्री रामकृष्ण विवेकानंद सेवा समिती, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने कराडात मंगळवारी (दि. २९) स्वामी विवेकानंद रथयात्रेचे आगमन होणार आहे. कराडसह सैदापूर व मलकापूर येथे रथयात्रा येणार आहे. या निमित्त ठिकठिकाणी चित्र प्रदर्शन व गं्रथ विक्री आणि व्याख्यानाचे आयोजन केले आहे.
स्वामी विवेकानंद यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त संपूर्ण भारतात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. श्री रामकृष्ण मठ, पुणे यांच्यामार्फत संपूर्ण महाराष्ट्रात स्वामी विवेकानंद यांच्या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. कराडात या सोहळय़ाच्या निमित्ताने श्री रामकृष्ण विवेकानंद सेवा समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रथयात्रा मंगळवारी (दि. २९) सायंकाळी ४ वाजता इंजिनिअिरग कॉलेज ते सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज (विद्यानगर) येथे, बुधवारी (दि. ३०) दुपारी ४ वाजता श्री पांढरीचा मारुती मंदिर ते दत्तचौक (कराड) येथे तर गुरुवारी (दि. ३१) सकाळी ११ वाजता दत्तचौक ते भारती विद्यापीठ, मलकापूर येथे होणार आहे. दरम्यान, या ठिकाणी चित्रप्रदर्शन व गं्रथविक्री होणार आहे. गुरुवारी सायंकाळी ६ वाजता स्वामी सुविज्ञेयानंद महाराज यांचे व्याख्यान होणार आहे. तरी या रथयात्रेत कराड शहरासह परिसरातील नागरिक, युवक, विद्यार्थी, शिक्षक, पालकांनी सहभागी होऊन स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा प्रचार, प्रसार करण्यात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे.