News Flash

दलितवस्ती सुधार योजनेत ‘तांबवे’ला द्वितीय क्रमांक

शासनाच्या शाहू फुले दलितवस्ती विकास अभियानांतर्गत दलितवस्ती सुधार योजना स्पध्रेत कराड तालुक्यातील तांबवे ग्रामपंचायतीने ३ लाख रूपये बक्षिसासह द्वितीय क्रमांक पटकावला. या घवघवीत यशाबद्दल पाहणी

| January 17, 2013 07:30 am

शासनाच्या शाहू फुले दलितवस्ती विकास अभियानांतर्गत दलितवस्ती सुधार योजना स्पध्रेत कराड तालुक्यातील तांबवे ग्रामपंचायतीने ३ लाख रूपये बक्षिसासह द्वितीय क्रमांक पटकावला. या घवघवीत यशाबद्दल पाहणी पथकातील वर्धा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर ढगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, वाढेगावचे सरपंच नरेंद्र पहाडे आणि सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा अरूणादेवी पिसाळ यांनी सरपंच प्रदीप पाटील यांचा सत्कार केला.  
शाहू फुले दलितवस्ती सुधार योजना अभियानांतर्गत स्पध्रेत सहभागी झालेल्या तांबवे ग्रामपंचायतीने दलितवस्तीत विकासाच्या योजना, वृक्षसंवर्धन, स्वच्छता मोहीम राबविल्याचे पाहणी पथकाला पहायला मिळाले. या पथकाने केलेल्या पाहणीनुसार तांबवे ग्रामपंचायतीचे काम आदर्शवत ठरल्याने ग्रामपंचायतीला द्वितीय क्रमांक मिळाला. यानिमित्ताने तांबवे ग्रामपंचायतीचे आदर्श काम आणि दलित वस्तीच्या विकासाचे महत्त्व लोकांसमोर मांडले गेले. तांबवे ग्रामपंचयतीच्या यशाबद्दल जिल्हा परिषद अध्यक्षा अरूणादेवी पिसाळ, उपाध्यक्ष संजीवराज निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित बांगर, अतिरिक्त अधिकारी तानाजी कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार आदींनी सरपंच प्रदीप पाटील, उपसरपंच आबासो पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक प्रमोद ठोके यांचे अभिनंदन केले.
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2013 7:30 am

Web Title: tambway gram panchayat grabbed 2nd position in competition
Next Stories
1 ‘सातारा जिल्ह्यात खाशाबा जाधव यांच्यासारखे खेळाडू निर्माण व्हावेत’
2 सूक्ष्म कीटकांमुळे पुण्यात
3 उपकुलसचिवांसह सातजणांच्या कोठडीत वाढ
Just Now!
X