News Flash

छेडछाड करणा-या युवकास अटक

अश्लील चित्रफितीद्वारे प्रवासी महिलेची छेडछाड करणा-या महाबळेश्वर येथील हिदायत हाशम वारुणकर (वय २६) याच्यावर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली

| October 28, 2013 01:57 am

 अश्लील चित्रफितीद्वारे प्रवासी महिलेची छेडछाड करणा-या महाबळेश्वर येथील हिदायत हाशम वारुणकर (वय २६) याच्यावर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे सोमवार पेठेतील विवाहिता पोलादपूर या आपल्या माहेरी जाण्यासाठी पुण्याहून दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी सुटणा-या पुणे- महाबळेश्वर- पोलादपूरमार्गे खेड (गाडी नं. एमएच १४ एटी २२४१) या एस.टी.ने प्रवास करीत होती. पाचगणी येथे गाडी आल्यावर तेथे एक युवक या महिलेच्या शेजारील सीटवर बसला.

पाचगणी येथून बस महाबळेश्वरकडे जात असताना या युवकाने आपल्याजवळील मोबाइलवर अश्लील चित्रफीत लावली व ती शेजारी बसलेल्या महिलेस दिसावी अशा पद्धतीने मोबाइल धरून तो पाहू लागला. याबाबत त्या महिलेने त्यास विचारणा केली असता त्याने तिच्याशी अरेरावी करीत छेडछाड काढली. त्याचा हा प्रकार वाढत गेला. अखेर महिलेने एस.टी.तील वाहकाला या गोष्टीची कल्पना देऊन त्यास मज्जाव करण्यास विनवले. वाहकालाही न जुमानल्याने संतप्त झालेल्या त्या महिलेने महाबळेश्वर येताच त्याला चांगलाच चोप दिला व तिने त्याला घेऊन महाबळेश्वरचे पोलीस ठाणे गाठले. सुरुवातीला ठाणे अंमलदार व अन्य कर्मचा-यांनी या महिलेची तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. मात्र नंतर अखेर दोन तासाने का होईना पोलिसांनी तिची तक्रार नोंदवून घेतली व त्यावरून पोलिसांनी हिदायत वारुणकर (रा. ४०१, गवळी आळी, महाबळेश्वर) यास ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला. रात्री उशिरा त्यास अटकही केली. पुढील तपास पो. नि. एन. बी. कोहीनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपनिरीक्षक डी. एस. शिरतोडे करीत आहेत.
हिदायत वारुणकरचे वडील महाबळेश्वर पालिकेत सफाई विभागातील कर्मचारी असून ते होमगार्डमध्येही आहेत. दरम्यान, या सर्व प्रकारात २ ते २।। तास गेल्याने तोपर्यंत खेड एस.टी. प्रवाशांसह महाबळेश्वरात उभी करावी लागली. अखेर रात्री १० च्या सुमारास तक्रारीची प्रत घेऊनच ती महिला त्याच बसमध्ये बसून पुढे मार्गस्थ झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2013 1:57 am

Web Title: tampering young arrested
टॅग : Arrested
Next Stories
1 प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सरकारकडे खंबीरपणे पाठपुरावा करू- जि. प. अध्यक्ष लंघे
2 नेव्ही बँडचा सूर, तालात कोल्हापूरकर चिंब
3 काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षांकडून इच्छुकांची चाचपणी
Just Now!
X