उत्कृष्ट शिक्षकांचा गौरव, विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या रूपात केलेले शिकविण्याचे काम, विद्यार्थ्यांच्या वतीने शिक्षकांप्रती व्यक्त करण्यात आलेली कृतज्ञता, व्याख्यान अशा विविध स्वरूपांत जिल्ह्यात शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
चांदोरीत शिक्षकांचा सत्कार
चांदोरी येथे क. का. वाघ कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालयात निफाडच्या तहसीलदार डॉ. जयश्री अहिरराव, क. का. वाघ शिक्षण संस्थेचे सचिव के. एस. बंदी, प्रा. विवेक मिशाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांच्या हस्ते १०० टक्केनिकाल लावणाऱ्या शिक्षकांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. महाविद्यालयाचे संपूर्ण कामकाज या दिवसापुरते विद्यार्थ्यांनी सांभाळले. यातील निवडक विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी डॉ. अहिरराव यांनी विद्यार्थ्यांना जीवनात ध्येय निश्चित करण्याचा सल्ला दिला. वाघ यांनी पारंपरिक शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षणाकडेही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी वळावे, असे आवाहन केले.
‘सीडीओ मेरी’मध्ये प्रभागातर्फे कार्यक्रम
नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या सीडीओ मेरी विद्यालयात शिक्षक दिन नगरसेवक रुची कुंभारकर व सुनीता शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला. शाळेतील सर्व पदाधिकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा प्रभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर होते. याप्रसंगी संस्थेचे कार्यवाह शशांक मदाने, सहकार्यवाह दिलीप अहिरे, मुख्याध्यापिका सी. एम. कुलकर्णी, उपमुख्याध्यापक यादव आगळे, संतोष शिंदे उपस्थित होते. मुख्याध्यापिका कुलकर्णी यांनी प्रास्तविक केले. सर्व शिक्षक शिक्षकेतरांचा सत्कार करण्यात आला. शिक्षकांच्या कार्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रा. रहाळकर यांनी सांगितले. सोनाली चिंचोले यांनी सूत्रसंचालन केले.
प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनतर्फे गौरव
नाशिक जिल्ह्य़ातील कोचिंग क्लासेस चालकांची संघटना प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन यांच्या वतीने जिल्ह्य़ातील सहा कोचिंग क्लासेस शिक्षकांचा ‘आदर्श शिक्षक’ म्हणून सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी व्यासपीठावर आ. जयप्रकाश छाजेड, आ. सुधीर तांबे, जयंत मुळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात प्रा. लोकेश पारख, प्रा. अण्णासाहेब नरुटे, प्रा. वितेंद्र पाटील, सीमा शिरोजकर, प्रा. अशोक देशपांडे आदी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. तसेच विशेष यश संपादन केल्याबद्दल प्रा. यशवंत पाटील, मयूर बच्छाव व प्रियंका पारख यांनाही गौरविण्यात आले. आ. तांबे यांनी शिक्षकांनंतर आई-वडिलांना सर्वात जास्त सन्मान दिला जात असल्याने त्यांचे योगदान खूप महत्त्वाचे ठरते, असे सांगितले.आ. छाजेड यांनी सध्याच्या परिस्थितीत फक्त शिक्षकच चांगले संस्कार करू शकतात, असे नमूद केले.

rte marathi news, rte latest marathi news
आरटीई अंतर्गत बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या चौथी, सातवीनंतरच्या शिक्षणाचे काय होणार?
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
student gave secret message to math teacher
विद्यार्थ्यांनी घेतली गणिताच्या शिक्षकाची परीक्षा! विद्यार्थ्यांची ‘ही’ युक्ती पाहून शिक्षक झाले थक्क! पाहा Video…