01 March 2021

News Flash

अतिरिक्त नसताना शिक्षकांचे समायोजन

संच मान्यतेनंतर एकही शिक्षक अतिरिक्त नसताना शिक्षण विभागाने मात्र अतिरिक्त शिक्षक दाखवून

| January 7, 2015 07:53 am

संच मान्यतेनंतर एकही शिक्षक अतिरिक्त नसताना शिक्षण विभागाने मात्र अतिरिक्त शिक्षक दाखवून त्यांचे समायोजन केले जात असताना त्याला महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने विरोध केला आहे. या महिन्यात अतिरिक्त दाखवून समायोजन करण्यात आलेल्या शिक्षकांचे वेतन रोखण्यात आल्याने शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी असून त्यांनी या संदर्भात शिक्षण विभागाच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
२०१३- १४ या शेक्षणिक वर्षांची संच मान्यता सत्र संपेपर्यंत पूर्ण करण्यात आले नाही. या मान्यतेचे आदेश जुलै-आॉगस्ट २०१४ मध्ये शाळांना देण्यात आले. प्रथम देण्यात आलेले आदेश रद्द करण्यात आले. काही शाळांना पुन्हा सुधारित संच मान्यतेचे आदेश सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये देण्यात आले आणि त्याचा परिणाम शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर झाला.
नागपूर जिल्ह्य़ातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये २०१२ -१३ , १३-१४, १४-१५ या कालावधीत रिक्त होणारी पदांची संख्या विचारात घेता एकही अतिरिक्त शिक्षक समायोजित होण्यासाठी शिल्लक राहणे अपेक्षित नाही. परंतु अतिरिक्त शिक्षक शिल्लक असताना वेगवेगळ्या गैरमार्गाने चुकीच्या पद्धतीने शिक्षक भरतीसंबंधाने कोणतेही आवश्यक निकष न पाळता शिक्षकांच्या नियमबाह्य़ नियुक्तया केल्या आणि शिक्षण विभागाने गैरमार्गाने या नियुक्तयांना मान्यता दिलेल्या आहेत. माहितीचा अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार निकषानुसार काही शाळांमध्ये शिक्षकांची जादा पदे मंजूर करण्यात आली असून त्यापैकी काही जागांवर कोणतीही जाहिरात न देता , ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त न करून घेता गैरमार्गाने शिक्षकांच्या नियुक्तया केल्या आहेत आणि त्या जुन्या तारखेत दर्शवून त्यांना शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. या शिक्षक मान्यता रद्द करून त्या जागांवर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केले पाहिजे मात्र शिक्षण विभागाने ज्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक आहेत त्या शाळेत शिक्षकांचे समायोजन केले जात आहे.
अनुदानित शाळेत रिक्त झालेल्या पदांवर त्याच शाळेतील विना अनुदान पदांवर कार्य केलेल्या शिक्षकांना काही ठिकाणी जुन्या तारखेत नियुक्त दर्शवून जुन्या तारखेत गैरमार्गाने त्यांच्या नियुक्तीला शिक्षण विभागाकडून मान्यता मिळवून त्यांना अनुदानित पदावर घेण्यात आल्याची बरेचशी प्रकरणे उघडकीस आली आहेत.
अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्याशिवाय अशा प्रकारे विना अनुदानित शिक्षकांना अनुदानित पदावर रुपांतरित करण्याचे व त्यांना अनुदानित भागावर मान्यता देण्याचे गैरप्रकार शिक्षण विभागाने केले आहेत. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांचे पूर्णत: समायोजन होण्यापूर्वीच विनाअनुदानित स्तरावरील शिक्षकांना अनुदानित स्तरावर आणून त्यांच्या नियुक्तयांना अनुदानावर मान्यता देणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी व अशा जागांवर प्रथम अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2015 7:53 am

Web Title: teacher protest in nagpur
टॅग : Maharashtra,Nagpur
Next Stories
1 विद्यार्थ्यांकडून नियमबाह्य़ शुल्क वसुली
2 हुडहुडी : पारा पुन्हा घसरला, नागपूर ६.६
3 जिल्ह्य़ातील १३४ अनुदानित शाळांची मान्यता धोक्यात
Just Now!
X