विविध विभागांतील २२ शिक्षकांना येथील महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने परशुराम साईखेडकर नाटय़गृहात आयोजित कार्यक्रमात ‘शिक्षण तपस्वी’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
अध्यक्षस्थानी शिक्षक सेनेचे राज्य चिटणीस पद्माकर इंगळे तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, अजय बोरस्ते, मेजर नागेश शेकदार, सुधाकर भालेकर उपस्थित होते. या प्रसंगी मेजर पी. बी. कुलकर्णी व चित्रकार शिवाजी तुपे यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. प्रास्ताविकात संपर्कप्रमुख संजय चव्हाण यांनी पुरस्कारांमागील भूमिका स्पष्ट केली. करंजकर यांनी शिक्षकांच्या कार्यामुळेच संस्कृतीचे जतन होत असल्याचे नमूद केले. इंगले यांनी शासनाचे शैक्षणिक धोरण व समस्यांविषयी शिक्षक सेना दोन फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचे सांगितले. या प्रसंगी तुपे व कुलकर्णी यांचेही मनोगत झाले.
सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. दिलीप फडके, डॉ. गजानन खराटे, अनंत येवलेकर, प्रा. मानस गाजरे, प्रा. परशराम वाघेरे, प्रसाद पवार, प्रा. के. एन. अहिरे, प्रा. के. पी. रायते, शिवाजी शिरसाठ, सी. बी. पवार, अनिल ढोकणे, ललित तिळवणकर, शहजाद हुसेन, विश्वनाथ शिरोळे, भारती पवार, राजेश भुसारे, संदीप देशपांडे, नंदलाल धांडे, मनीषा नलगे, राजेंद्र गिते यांना गौरविण्यात आले. सूत्रसंचालन रवींद्र मालुंजकर यांनी केले. आभार शिक्षक सेनेचे मधुकर वाघ यांनी मानले.