शालेय शिक्षण विभागाने अनुदानित खासगी प्राथमिक शाळेतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे अन्य अनुदानित खासगी माध्यमिक शाळांमध्ये समायोजन करण्याची मागणी कायम असून त्यासाठी शासनाकडे तगादा लावला आहे.
शक्य नसल्यास त्यांचे अनुदानित माध्यमिक शाळांत समायोजन करण्यात यावे. ज्या ठिकाणी पाचवी ते आठवीचे वर्ग आहेत तेथील रिक्त पदांवर शिक्षकांचे समायोजन करण्यात यावे, अशा सूचना २६ मार्च २०१४ ला शासन निर्णयाद्वारे केलेल्या आहेत. शासन निर्णयात समायोजनाची जबाबदारी माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांवर सोपवली आहे. खासगी प्राथमिक शिक्षक संघाने प्राथमिक शाळेतील शिक्षकांचे समायोजन पूर्व माध्यमिक विभागात व्हावे यासाठी अनेक आंदोलने केली.
नागपूर जिल्ह्य़ातील प्राथमिक विभागातील २१ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन माध्यमिक शाळेत केले. यासाठी तत्कालीन शिक्षण उपसंचालकांनी आदेश काढला. परंतु काही संस्थाचालक व व्यवस्थापनधार्जिण्या संघटनांमुळे प्राथमिक शिक्षकांचे समायोजन थांबवण्यात आले. नरेश मुळे, किशोर पटोले या नवयुग प्राथमिक शाळेतील शिक्षकांचे याच संस्थेच्या राजबाक्षामधील पंडित बच्छराज व्यास हायस्कल येथील समायोजनाचेही आदेश थांबवले. खासगी प्राथमिक शिक्षक संघाने प्राथमिक शिक्षकांच्या समायोजनाची बाब पुन्हा पुन्हा शासनासमोर ठेवली.
गेल्यावर्षी १७ डिसेंबरला नागपूर विधिमंडळासमोर व १८ फेब्रुवारीला पुण्याच्या शिक्षण संचालक यांच्या कार्यालयासमोर आंदोलने केली. यात शिक्षण सचिव अश्विनी भिडे, शिक्षक आयुक्त एस. चाक्कलिंगम यांच्या पुढाकाराने संच मान्यता आणि प्राथमिक शिक्षकांच्या समायोजनाचा विषय पर्णत्वास जाईल, अशी अपेक्षा अध्यक्ष प्रमोद रेवतकर, सुनील चिचघरे, विजय नंदनवार, मनोज तातोडे, संजय बोरगावकर, लोकपाल चापले, मोहन सोमकुंवर आणि ज्ञानेश्वर वाघ यांनी केले.