News Flash

नक्षलग्रस्त विशेष भत्याविरोधात शिक्षकांचे ५ एप्रिलला आंदोलन

शासनाने बंद केलेल्या नक्षलवादग्रस्त विशेष भत्याच्या विरोधात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघासह विविध शिक्षक संघटनांनी ५ एप्रिलला जिल्हा परिषदेसमोर आंदोलनाचे आयोजन केले असून या आंदोलनात जास्तीत

| April 3, 2013 02:47 am

शासनाने बंद केलेल्या नक्षलवादग्रस्त विशेष भत्याच्या विरोधात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघासह विविध शिक्षक संघटनांनी ५ एप्रिलला जिल्हा परिषदेसमोर आंदोलनाचे आयोजन केले असून या आंदोलनात जास्तीत जास्त शिक्षकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेने केले आहे.
राज्य शासनाने शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व इतर राज्यातील इतर कर्मचाऱ्यांना वेतनाच्या १५ टक्के हा भत्ता २००४ व २००५ पासून देण्यात येत होता, मात्र ४ फेब्रुवारी २०१३ पासून जिल्ह्य़ातील पोंभुर्णा, बल्लारपूर, मूल, सावली, कोरपना, चंद्रपूर या तालुक्यांना या भत्यापासून वगळण्यात आले. या जिल्ह्य़ात नक्षलवाद संपुष्टात आणण्यात शासनाला यश आलेले नसतांनाही शासनाने हा भत्ता बंद केल्याने हा कर्मचाऱ्यांवर अत्याचार आहे. या अत्याचाराच्या विरोधात सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र यावे, असे आवाहन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर अडबाले, विजुक्टाचे जिल्हाध्यक्ष प्रा. अशोक पोफळे, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष श्रीधर फटाले, सचिव राजू साखरकर, नुटाचे प्रा. साकुरे, यंग टिचर्स असोशिएशनचे प्रा. अनिल शिंदे, चंद्रपूर-गडचिरोली महाविद्यालयीन कर्मचारी संघाचे गजानन काळे, शिक्षकेतर कर्मचारी संघाचे अवधुत कोटेवार, एम.सी.व्ही.सी. केंद्राचे सदस्य प्रा. सुधीर चवरे आदींनी केले आहे, अशी माहिती पत्रकाव्दारे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रसिध्दी प्रमुख प्रभाकर पारखी यांनी कळवले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2013 2:47 am

Web Title: teachers strike on 5th april for getting the naxlites allowance
टॅग : Teachers Strike
Next Stories
1 वृत्तपत्र वाचकांवर अतिरीक्त भरूदड अन्यायकारक
2 विदर्भाची शेती पारंपरिक चक्रव्यूहाच्या फे ऱ्यात
3 एलबीटी विरोधात व्यापाऱ्यांचा कडकडीत ‘नागपूर बंद’
Just Now!
X