08 August 2020

News Flash

कर्नाटकातून आलेला दहा लाखांचा गुटखा जप्त

बेंगलोरहून नांदेडात रेल्वे पार्सलने आलेला सुमारे १० लाख रुपयांचा गुटखा रेल्वे पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी एकाला एटक करण्यात आली आहे. राज्य सरकारने राज्यात गुटखा तसेच

| December 4, 2012 01:19 am

बेंगलोरहून नांदेडात रेल्वे पार्सलने आलेला सुमारे १० लाख रुपयांचा गुटखा रेल्वे पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी एकाला एटक करण्यात आली आहे.
राज्य सरकारने राज्यात गुटखा तसेच पान मसाल्यावर बंदी घातली आहे. असे असले तरी लगतच्या आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्यात गुटखा विक्रीला मुभा आहे. नांदेडात बंदीचा फारसा परिणाम झाला नाही. जादा दराने, छुप्या मार्गाने अनेक ठिकाणी गुटख्याची विक्री होते. बेंगलोरहून आलेल्या एका रेल्वे पार्सलमध्ये ‘राज कोल्हापुरी’ नावाचा गुटखा नांदेडला आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. बेंगलोरहून येणाऱ्या हम्पी एक्सप्रेसने ३० नोव्हेंबर रोजी हा गुटखा आला. गोपालभाई यांच्या नावाने आलेल्या या गुटख्यावर नारळी दोरीचे पार्सल असा उल्लेख होता.
गुटख्याचे हे पार्सल घेण्यासाठी आज निसार अहमद (रा. गोवर्धन घाट) हा आल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले. सर्व पार्सलचे सील तोडण्यात आले. तेव्हा त्यात तब्बल १० लाख रुपयांचा गुटखा आढळून आला. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी निसार अहमद याच्याविरु द्ध गुन्हा दाखल केला आहे. नांदेड जिल्ह्य़ात यापूर्वी अन्न व औषध प्रशासनाने मोठय़ा प्रमाणावर गुटख्याचा साठा जप्त केला होता.     

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2012 1:19 am

Web Title: ten lakhs guthkha found wich were came from karnatak
टॅग Railway
Next Stories
1 मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या नामांतराविरोधात परभणीत मोर्चा
2 नियमबाह्य़ बंधाऱ्यांकडे श्वेतपत्रिकेत डोळेझाक
3 खाकी वर्दीतील ‘रझाकारी’ चा नमुना
Just Now!
X