05 April 2020

News Flash

ठाणेकर वर्षांची आयपीएल भरारी!

क्रिकेट हा भारतात धर्म मानला जात असला तरी क्रिकेटवेडय़ांमध्ये महिलांची संख्या तशी कमीच आहे. त्यातही प्रत्यक्ष मैदानात उतरून क्रिकेट खेळणाऱ्या किंवा या खेळाला आपलेसे करून

| May 8, 2015 07:41 am

आयपीएलच्या सामन्यात क्रिकेट स्कोअररची जबाबदारी
क्रिकेट हा भारतात धर्म मानला जात असला तरी क्रिकेटवेडय़ांमध्ये महिलांची संख्या तशी कमीच आहे. त्यातही प्रत्यक्ष मैदानात उतरून क्रिकेट खेळणाऱ्या किंवा या खेळाला आपलेसे करून त्यात कारकीर्द घडवणाऱ्या महिलांचे प्रमाण अत्यल्प आहे. मात्र, ठाण्यात
राहणाऱ्या वर्षां नागरे या तरुणीने क्रिकेटचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतानाच या क्षेत्रात ‘स्कोअरर’ म्हणून स्वत:ची कारकीर्दही सुरू केली आहे. सध्या सुरू असलेल्या आयपीएलच्या सामन्यात वर्षांने ‘स्कोअरर’ची भूमिका बजावली.
ठाण्यातील लोकमान्य परिसरातील यशोधननगर येथे लहानाची मोठी झालेल्या वर्षांच्या घरात क्रिकेटची पाश्र्वभूमी नसताना तिला या खेळाने लळा लावला. या खेळात करिअर घडवण्यासाठी तिने माटुंगा येथे चालणाऱ्या अर्जुन पुरस्कारविजेत्या क्रिकेटपटू सुरेखा भंडारी यांच्याकडे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली, परंतु घरातून विरोध होऊ लागल्याने तिला क्रिकेटचे मैदान सोडावे लागले. मात्र क्रिकेटची साथ तिने सोडली नाही. या खेळात महिलांचा शिरकाव व्हावा, यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने चालवलेल्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून वर्षांला १९व्या वर्षी स्कोअरर म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
२००८मध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनची स्कोअरर परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर दोनच वर्षांत ती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची परीक्षा देऊन राष्ट्रीय पातळीवर पोहोचली. तेव्हापासून गेली पाच वर्षे ती स्कोअररचे काम करत आहे. अलीकडेच वानखेडे स्टेडियमवर झालेल्या मुंबई विरुद्ध पंजाब सामन्यात ‘धावफलक हलता ठेवण्याचे काम’ वर्षांने केले.

क्रीडा क्षेत्र खूप व्यापक असले तरी तुम्हाला संधी शोधण्याची गरज आहे. सुरुवातीच्या काळात अनेक संकटे येण्याची शक्यता असते. आपले निर्णय चुकीचे तर नाहीत नाही, असासुद्धा प्रश्न पडतो. मात्र चांगले लोक भेटू लागल्यावर हा सगळा गुंता सुटत जातो आणि चांगले करिअर अनुभवता येते. स्थानिक स्तरावरती सामन्यांचे स्कोअरिंग करत असताना मैदानातील धूळ, उन्हाचा कडाका, पाण्याची व्यवस्था, तर कधी स्वच्छतागृहाची समस्यासुद्धा भेडसावत असे. मात्र या सगळ्या अडचणीच आपल्याला मोठं करतात.
– वर्षां नागरे

 

श्रीकांत सावंत, ठाणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2015 7:41 am

Web Title: thane girl in ipl
टॅग Ipl,Loksatta
Next Stories
1 पोलीस आयुक्त, अवर सचिव, तहसीलदार यांची वीज कोण तोडणार?
2 गायक अभिजीतवर ॠषी कपूरचे टीकास्त्र
3 मरिन ड्राइव्हचे सौंदर्यीकरण की विद्रूपीकरण..
Just Now!
X