दि ठाणे डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह हौसिंग फेडरेशनची जाहीर करण्यात आलेली निवडणूक मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. ही निवडणूक २५ ऑगस्ट रोजी होणार होती. निवडणूक निर्णय अधिकारी ठाणे तालुक्याचे उपनिबंधक संतोष बिडवई यांनी २३ जुलै रोजी या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला होता, मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या ९७व्या घटना दुरुस्तीनुसार या निवडणुकांसाठी निवडणूक प्राधिकरण तयार झाल्याने सर्व निवडणुका प्राधिकरणाच्या माध्यमातून घेण्यात येणार आहेत. त्यामुळे २५ ऑगस्टला होणारी निवडणूक पुढे ढकलण्यात आली असून डिसेंबपर्यंत या निवडणुका घेतल्या जातील, असे शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.