हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णयुगात अनेक दिग्गज संगीत दिग्दर्शकांनी अवीट गोडीची गाणी देऊन चित्रपट संगीत लोकप्रिय केले. यामध्ये संगीत रचना सजविणाऱ्या वादकांचे महत्त्व आणि योगदानही मोठे आहे. कावस लॉर्ड हे या क्षेत्रातले मोठे नाव होते. त्यांचे पुत्र केरसी आणि बुजी यांनी शेकडो गाण्यांसाठी वाद्ये वाजवून ती गाणी अजरामर केली. कावस लॉर्ड यांच्या चित्रपट संगीतातील कामगिरीवर ‘द ह्य़ूमन फॅक्टर’ हा माहितीपट रूद्रदीप भट्टाचारजी यांनी तयार केला आहे. या माहितीपटाचा विनामूल्य  खेळ रविवार, ७ जुलै रोजी कर्नाटक संघाच्या सभागृहात सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. केरसी लॉड,   उल्हास बापट हेही या माहितीपटाच्या खेळाला उपस्थित राहणार आहेत.