वाडिया पार्क क्रीडा संकुलातील वादग्रस्त इमारतींमधील गाळे पुढच्या आठवडय़ातच सील करण्यात येणार आहेत. या नोटिसांची मुदत बुधवारी संपली असली तरी सील ठोकण्याच्या कारवाईस दि. ४ फेब्रुवारीपर्यंत मुदत असल्याने ही कारवाई पुढच्याच महिन्यातच होईल.
वाडिया पार्क क्रीडा संकुलातील शहराकडील रस्त्यालगत विकसकाने बांधलेल्या दोन व्यापारी इमारती (ए आणि बी विंग) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बेकायदेशीर ठरवून त्या पाडण्याचा आदेश दिला आहे. आदेशाच्या अंमलबजावणीची जबाबदारी विभागीय महसूल आयुक्तांवर सोपवण्यात आली असून, त्यांनी त्यासाठी नगरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र पाटील यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. पाटील यांनी येथील गाळेधारकांना नुकत्याच नोटिसा बजावून येथे गाळे रिकामे करण्यासाठी मंगळवापर्यंत मुदत देण्यात आली आहे तसा आदेशही त्यांना बजावण्यात आला आहे.
अतिक्रमणातील इमारती पाडण्यासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कालबद्ध कार्यक्रम ठरवून दिला आहे. त्यानुसार गाळे रिकामे करण्याची नोटीस दिल्यानंतर दि. ४ फेब्रुवारीपर्यंत ते सील करण्यास मुदत आहे. त्यानुसारच पुढच्या महिन्यात त्या आसपास ही कारवाई केली जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली. खंडपीठाने या संकुलातील ए आणि बी विंगच्या इमारती अतिक्रमण ठरवल्या आहेत. त्यातील ए विंगच्या इमारतीत गाळे आहेत. बी विंगची इमारत मोकळीच आहे. या कारवाईच्या भीतीने गाळेधारकांचे धाबे दणाणले आहे. चरितार्थाचा विचार करून हे गाळे नियमित करावे अशी याचिका त्यांनी खंडपीठात दाखल केली होती. मात्र ती फेटाळण्यात आली आहे. परंतु काही गाळेधारकांनी त्यावर आज सुनावणी होऊन खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली.
दरम्यान, संकुलाच्या विकसकाने आता खंडपीठाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर येत्या दि. ३१ला सुनावणी होणार आहे.

पुनर्वसनाची मागणी
या संकुलातील ए विंगमध्ये सुमारे ८० गाळे आहेत. त्यातील ४० गाळेधारक या जागेवर संकुल होण्याआधीपासून होते. त्यांनी वाडिया पार्क गाळेधारक निराकरण समिती स्थापन केली असून यe समितीने बुधवारी जिल्हाधिका-यांना निवेदन दिले. या जागेवरील पूर्वीच्याच गाळेधारकांचे पुनर्वसन करण्यात आले असून महानगरपालिका, जिल्हा क्रीडा संकुल समिती व विकास यांच्यातील रीतसर कराराने तब्बल १ हजार ८०० रुपये स्क्वेअरफूट दराने हे गाळे आम्ही खरेदी केले आहेत. रीतसर ताबा मिळाल्यानंतरच सन २००६ मध्ये या गाळ्यांमध्ये आमचे पुनर्वसन करण्यात आले आहे. नव्या आदेशानुसार ही इमारत पाडल्यानंतर आमच्या चरितार्थाचा आधार जाणार असून त्याचे महत्त्व लक्षात घेऊन अन्य जागेवर आमचे पुनर्वसन करावे अशी मागणी या गाळेधारकांनी केली आहे.   

Normal
0

MicrosoftInternetExplorer4

/* Style Definitions */
table.MsoNormalTable
{mso-style-name:”Table Normal”;
mso-tstyle-rowband-size:0;
mso-tstyle-colband-size:0;
mso-style-noshow:yes;
mso-style-parent:””;
mso-padding-alt:0in 5.4pt 0in 5.4pt;
mso-para-margin:0in;
mso-para-margin-bottom:.0001pt;
mso-pagination:widow-orphan;
font-size:10.0pt;
font-family:”Times New Roman”;}