News Flash

पुराचा धोका टाळण्यासाठी अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग

कृष्णेच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पावसामुळे कृष्णा, पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत झपाटय़ाने वाढ होत असून लोकवस्तीला धोका पोहचू नये यासाठी खबरदारी म्हणून कर्नाटकातील अलमट्टी

| July 21, 2013 01:40 am

कृष्णेच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पावसामुळे कृष्णा, पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत झपाटय़ाने वाढ होत असून लोकवस्तीला धोका पोहचू नये यासाठी खबरदारी म्हणून कर्नाटकातील अलमट्टी धरणातून प्रतिसेकंद ३८ हजार ८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. आज वारणा, कोयना,पंचगंगा नदीत धरणातील पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला असून सायंकाळी ५ वाजता संपलेल्या २४ तासात सर्वाधिक पावसाची नोंद महाबळेश्वर येथे १७० मि.मी. झाली.
चांदोली येथील वसंतसागर धरणात पाणीसाठा ८१ टक्के झाला असून या भागात रात्रीपासून पावसाची संततधार सुरु आहे. पाटबंधारे विभागातर्फे शनिवार सकाळपासून या धरणातून ५८०० क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. धरणाचे दरवाजे २ फुटांनी उचलण्यात आले आहेत. तसेच कोयनेवरील शिवसागर जलायशयातून पाण्याचा विसर्ग आजपासून वाढविला आहे. या ठिकाणाहून १२४१६ क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. कोयना धरणातील पाणीसाठा ८३.८० टी.एम.सी. झाला आहे. धोम धरणातील पाणीसाठा ८.२६ टी.एम.सी. झाला आहे. दूधगंगा धरणातून ८००० व राधानगरी धरणातून २२०० क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. कृष्णा, कोयना, वारणा, पंचगंगा या नदी पात्रात मोठय़ा प्रमाणात पाणी आहे.
सांगली पाटबंधारे विभाग नदीकाठच्या गावांचा धोका टाळण्यासाठी अलमट्टी धरण व्यवस्थापनाशी सातत्याने संपर्कात आहे. कोयना,चांदोली,दूधगंगा व राधानगरी धरणातील पाण्याचा विसर्ग अलमट्टी धरण व्यवस्थापनाला कळविण्यात आला असून अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. या धरणातून प्रतिसेकंद ३८ हजार ८०० क्युसेक्स पाणी सोडण्यात येत असल्याची माहिती सांगली पाटबंधारे मंडळाकडून सायंकाळी देण्यात आली. अलमट्टी धरणातील पाणी पातळी ५१८.३० मीटर झाली असून या धरणाची उच्चतम पाणी पातळी ५१९.६० मीटर आहे.
कृष्णेच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अद्याप कायम आहे. शनिवारी सायंकाळी ५ वाजता कोयना येथे १०१, धोम येथे ४२, महाबळेश्वर येथे १७० आणि नवजा येथे १३६ मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याचे पाटबंधारे विभागाच्या पूरनियंत्रण कक्षातून सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2013 1:40 am

Web Title: the sign of water in alamatti dam for avoid danger flood
टॅग : Danger,Flood
Next Stories
1 चोरटय़ांच्या मारहाणीत एकाचा मृत्यू
2 सीना व भीमा पात्रातील अतिक्रमणे हटवण्याच्या प्रशासनाच्या सूचना
3 सोलापूर महापालिकेत काँग्रेसच्या विरोधात राष्ट्रवादीचा पुन्हा संघर्ष
Just Now!
X