मानसिक छळ म्हणजे नेमके काय याची नेमकी व्याख्या अद्याप तयार झालेली नाही. मात्र पत्नीची सामाजिक अवहेलना होत असल्यास तो मानसिक छळच असल्याचे कुटुंब न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयाने स्पष्ट केले आहे. पत्नीबरोबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमांना, सोहळ्यांना, पाटर्य़ाना जाणे टाळण्यात, किंबहुना त्याकडे हेतूत: दुर्लक्ष करून त्याऐवजी घरात झोप काढण्यात धन्यता मानणाऱ्या पतीची वागणूक म्हणजे पत्नीबरोबरचे मानसिक क्रौर्यच आहे. या कारणासाठी पत्नीला पतीपासून घटस्फोट मिळू शकतो, असा स्पष्ट निर्वाळा कुटुंब न्यायालयाने दिला आहे. संबंधित महिलेचा विवाह २००८ मध्ये झाला आणि अमेरिकेत नोकरी करणाऱ्या पतीसोबत ती अमेरिकेला रवाना झाली. परंतु तेथे गेल्यानंतर तिचा पती तिच्याशी आपण जणू काही अनोळखी आहोत आणि आपला एकमेकांशी काहीच संबंध नाही अशा पद्धतीने वागू लागला. परिणामी आपल्यात कधीच वैवाहिक संबंध प्रस्थापित झाले नाहीत. उलट एके दिवशी बाहेर जात असताना पतीने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली. वर तर त्याने आपल्याला भारतात परत जाण्यासही बजावले. मित्रांकडून आलेल्या जेवणाच्या निमंत्रणांकडेही तो दुर्लक्ष करीत असे आणि त्याऐवजी घरी एकटेच राहणे पसंत करून तो वेळ झोपण्यात अथवा खाण्यात घालवत असे, असा दावा या पत्नीने घटस्फोटासाठी केलेल्या अर्जात केला होता. त्याच्या भावाच्या मुलीच्या वाढदिवसाच्या पार्टीला आम्ही गेलो होतो. परंतु नातेवाईकांसोबत गप्पा मारणे, किंवा बोलणे दूर तो त्या सगळ्यांपासून अलिप्त होता. त्याच्या या स्वभावाला कंटाळून आपण त्याच्या घरच्यांना ही बाब सांगितली. त्यानंतर घरच्यांनी समजावल्यानंतर त्याने त्याच्या विक्षिप्त वागणुकीसाठी आपली माफीही मागितली. मात्र त्याची ही विक्षिप्त वागणूक काही सुधारली नाही. अन्य जोडप्यांप्रमाणे आपणही सर्वसाधारण जीवन जगावे यासाठी वारंवार विनवण्या करूनही त्याच्या वागण्यात काहीच सुधारणा झाली नाही. शिवाय वैवाहिक जीवनही या सगळ्यामुळे तेथेच अडकून पडले होते. या सगळ्याला कंटाळून अखेर आपण भारतात परतलो आणि घटस्फोटाचा निर्णय घेतला, असे पत्नीने घटस्फोट अर्जात म्हटले आहे. तिच्या अर्जावर कुटुंब न्यायालयाने पतीला नोटीस बजावून आपले म्हणणे मांडण्याचे आदेश दिले. परंतु त्याच्याकडून एकाही नोटीसला प्रतिसाद देण्यात आला नाही. अखेर न्यायालयाने पत्नीची बाजू मान्य करीत एकतर्फी निर्णय देत तिचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला.

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
puberty starting earlier and why it matters health experts Said About signs caution and care You Must Know About
कमी वयात पौगंडावस्थेत येण्याची लक्षणे कोणती? त्यावर काही उपचार आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला…
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…