स्त्रीशक्तीचे सामथ्र्य साजरे करण्यासाठी कुठल्याही महिली दिनाची आवश्यकता नसून प्रत्येक दिन महिलांसाठी खास असतो. फक्त तुमच्यामधील शक्तींचा वापर योग्य मार्गासाठी आणि कार्यासाठी केलात, तर तुमच्यावर कोणालाही वर्चस्व गाजवता येणार नाही. समाजसेवेचे व्रत धारण करायचे असेल तर सर्व गोष्टींचा त्याग करण्याची तयारी असावी हे प्रामुख्याने ध्यानात घ्यावे, असे मत सिडको भवनमध्ये महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात करण्यात आलेल्या कार्यक्रमात समाजसेवकिा मंदाकिनी आमटे यांनी व्यक्त केले.
सिडको कर्मचारी संघटनेच्या वतीने महिला दिनानिमित्त सोमवारी सिडको भवन सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे  उपस्थित होते. या वेळी निवेदिका अािण लेखिक पद्मश्री राव यांनी डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांची मुलाखत घेतली. या वेळी हेमलकसामधील कार्याचा अनुभव व प्रकल्पाची वैशिष्टय़े याबद्दल डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी दिलखुलास गप्पा मारल्या.
 महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा, आंध प्रदेश आणि मध्य प्रदेश या भागांतील माडिया गोंड जमातीच्या विकासासाठी लोक बिरादारी प्रकल्प राबविला. या अनोख्या प्रकाल्पातील कर्तृत्ववान कार्याबाद्दल आमटे दाम्पत्याला २००८ मध्ये कम्युनिटी लीडरशिपसाठी मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या प्रकल्पामध्ये रुग्णालय सुविधेसाठी लोक बिरादारी प्रकल्प दवाखाना, लोक बिरादारी प्रकल्प निवासी विद्यालयच्या रूपात आश्रमशाळा आणि अनाथ, जखमी, वन्य पशुवर्गासाठी आमटे अ‍ॅनिमल आर्क यांचा समावेश होता. द आर्क या अनाथालयात अशा वन्यजीवांची देखभाल केली जाते ज्यांच्या पालकांची आदिवासींनी मजेसाठी किंवा मनोरंजनासाठी नाही तर फक्त अन्नासाठी हत्या केली आहे, असे आमटे म्हणाले. तर  मॅगसेसे पुरस्कारामुळे केवळ प्रसिद्धी मिळाली नाही, तर आदिवसींच्या जीवनमानाची वास्तविकता कळली. नशिबाने संस्थेसाठी आम्हाला २५ लाख रुपये मिळाले. असे आमटे आवर्जून म्हणाले. तर या मानधनाचा वापर आम्ही आदिवसींच्या विकासासाठी केला. या संस्थेमध्ये कुष्ठरोगी, अंध व्यक्ती, अपंग यांसारख्या एकूण ३००० व्यक्ती एका कुटुंबासारख्या राहत आहेत. या वेळी कार्यक्रमात यशदा प्रशिक्षण केंद्रात पदव्युत्तर अभ्यासक्रमात सहभागी झालेल्या सिडकोतील महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.